सरिताचो होकार माका कळलो होतो. दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघा नेहमीसारखी भेटलो..कॉलेजातही वांगडान गेलो.. पण यावेळी सरिता बोलूक घाबरत होता. माका पण काहीच कळत नव्हता. काय बोलूचा..कसा बोलूचा.. सरिता काय बोलात? असो सगळो डोक्यात प्रश्नांचो फेरो सुरू झालो.

एसटीतून खाली उतरासर मी काहीच बोलाक नाय.. तिच्याही तोंडास्तून काहीच निघाला नाय..सुरवात कोणी करुची ह्येचोच प्रश्न होतो..कॉलेजात सरिता तिच्या जागेवर जाऊन बसला नी मी माझ्या. मी केलेल्या हिंमतीची माहिती मनात ऱ्हावत नव्हती..कुणाक तरी सांगूचा मन करत होता. त्या दिवशी कॉलेजात घाऱ्याक घडलेला सगळा सांगितलय.

stray dogs at least five dog attack on kid cctv footage video viral on social media
VIDEO: भयंकर! घाबरून पळणार इतक्यात जमिनीवर पाडलं अन्…; चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला
amla powder with coconut oil good for hair growth
खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून लावल्यास खरेच केसांची वाढ होते का? डॉक्टर म्हणाले…
What happen if color is applied on the uniform of a policeman?
होळीच्या बंदोबस्तावेळी पोलिसांच्या वर्दीला रंग लागला तर काय? आपण पोलिसांना रंग लावू शकतो का? जाणून घ्या
Benefits Of Eating Green Banana
कच्च्या केळीमधील पोषणाचा साठा किती? जेवणात हिरव्या केळ्यांचा कसा वापर करावा, कुणाला होईल सर्वाधिक फायदा?

घाऱ्याच्या कपाळावरच्या आट्यापासून त्याका काय म्हणूचा हा ता लक्षात आला होता..पण त्याच्या चेहऱ्यावर माझ्यासाठीचो आनंद पण दिसत होतो..घाऱ्याक सरिता कसा होता हे ठावूक होता आणि तो माकाही चांगलो वळखत होतो..पण आमचा प्रेम समाजाक मान्य होऊचा नाय याचो घाऱ्याक विचार सतावत होतो..

”कमल्या..माका ऐकून बरा वाटला पण परिस्थिती काय आसा ती तुकापण चांगली माहित आसा..”

”घाऱ्या..त्यावेळी माझ्या मनात जा इला ता मी बोललंय, बाकी माका काय माहित नाय”

”माका लय भारी वाटता..कमल्या….तू प्रेमात पडलंस”
—————————-
घाऱ्याच्या मनात जो विचार घोळत होतो..तो सरितानं पण विचार केल्यान आसात असा माझ्या मनात इला..म्हणून मी यावर सरिताशी बोलूचा ठरवलंय…सरिता मैत्रिण आसानही आज माका तिच्या वांगडा बोलाक भिती वाटाक लागली. तरीही मी डेअरिंग केलंय..

”सरिता..माका तुझ्याशी बोलूचा हा..व्हाळाजवळ भेटशीत?” कॉलेजातून निघाल्यावर मी सरिताक इचारलंय.

”चलात..” एवढाच सरिता बोलला आणि वाटेक लागला. माका जा वाटत होता त्येका पण तसाच वाटत होता..तेकापण बोलूचा होता.

व्हाळाजवळसूनच एक रस्तो..टेकडीकडे जाता..त्या टेकडीपलिकडे वड, पिंपळ..अशी मोठी झाडा होती.. त्यामुळे थय सावली आणि एकांत मिळात म्हणून आम्ही दोघा थय गेलो..
सरितान थेट विषयाक हात घातलो..

”कमलेश..तुका काय वाटता आपला काय होईत?”

”मी तो विचार करुकच नाय”

”मग, कशाक उगाच बोललस त्या दिवशी” सरितानं रागान इचारल्यान.

मी हिंमत करून सरिताचो हात पकडलंय..सरिता रागान हात सोडवूक पाहात होता..पण मी मूठ घट्ट पकडलंय..तरी तिचो हात सोडवून घेवूची धडपड सुरूच होती.

”सरिता..माका तू आवडतंस…इतक्याच माहित हा माका..पुढचो इचार नाय केलंय..जा होईत त्येका सामोरा जाऊक मी तयार आसंय”

मी असो इश्वास दाखवल्यार सरितानं हाताची धडपड थांबवल्यान.. त्याका जा व्हया होता ता घडला.. कारण, त्याना माझो हात आता घट्ट पकडल्यान होतो. माझ्या खांद्यार डोक्या ठेवून सरितान कसलोच इचार न करता स्वत:क झोकून दिल्यान..सरिताची ही तयारी पाहून माझो आत्मविश्वास वाढलो. मी ही तिच्या प्रेमात अजूनच पडलंय..

”पुढे जा होईत ता होईत..” असा दोघांनीही ठरवल्यानी.

ह्या कानाचा..त्या कानाक कळता कामा नये म्हणून असो आमचो प्रेमाचो मामलो सुरू झालो.

सरितानं माझ्यासाठी एकदा फणसाची भाजी करून आणल्यान..

फणसाची भाजी म्हणजे माझो जीव की प्राण… सरिताक ह्या चांगलाच ठावूक होता. त्यामुळे त्येना माझ्यासाठी खास वेगळोच डबो भरून आणलो होतो.

सरिता नेहमी त्याच्या मैत्रिणीवांगडा डबो खाय आणि मी घाऱ्यावांगडा.
वर्गात येऊच्या आधीच सरितानं माका डबो दिल्यान.

”काय रे..कमल्या..आज दोन-दोन डबे”

घाऱ्याक कळला होता..तो डबो सरितानंच आणल्यान होतो… पण तो मुद्दाम माझी खोड काडूक इचारत होतो, ह्या माका कळला होता.

”कशाक कळीचो नारद बनतस..गप्प तुका व्हया असात तर खा..”

”माका नको..सरिता वैनींन खास तुझ्यासाठी आणल्यान.. मी कशी खाऊ”

”घाऱ्या मार खाशीत आता”

डबो खाऊन झाल्यार रोजच्यासारख्या वर्गात जागेवर जाऊन बसलंय.. सरिता आधीपासूनच माझी वाट पाहात होता.. तेच्या चेहऱ्यावरचे भाव माका कळत होते..

भाजी छान झाल्याचा मी त्याका हातवारे करुन सांगितलंय.. तेच्या चेहऱ्यावर लगेच हसू इला.. घाऱ्या आमच्यार बघून मजा घेत होतो..

दुसरो दिवस माझ्या काळजाचो ठोको चुकवणारो ठरलो.. सरिताचो डबो माझ्याच बॅगेत राहिलो. दुसऱ्या दिवशी माझ्या आवशीन डब्यावर कोरलेला नाव वाचून तो डबो ओळखल्यान..

”काय रे.. कमलेश सरिताच्या घरचो डबो तुझ्या बॅगेत कसो? सरिताच्या आवशीन दिल्यान काय?”

आवशीनच बचावाचो मार्ग काढून दिल्यान…मी लगेच ‘हो’, म्हणान सांगलय आणि विषय संपवलंय.

पण चुलीतला लाकूड चुलीतच जळाक व्हया.. बाहेर पडलो तर चटको लागता ह्याच खरा. एकदा धोक्याची घंटा होऊन पण आमका तालुक्यात सरिताच्या नातेवाईकान एकत्र बघितल्यान आणि सगळीकडे पसरवल्यान.

तालुक्यात सरितावांगडा सिनेमाक गेलंय व्हतंय.. काळजी घेऊनपण माशी शिंकलीच.. सरिताच्या नातेवाईकान एसटी स्टॅण्टवर बघितल्यानं आणि आमचो पाठलाग केल्यान.. आम्ही एकत्र सिनेमा बघुक गेलव ह्या त्येका कळला…

घरी इल्यावर आरती ओवाळूक जसे उंबऱ्यावर उभे ऱ्हवतत.. तसे घरचे उभे होते. तो दिवस आमच्या प्रेमाचो काळो दिवस ठरलो.. घरच्यांका इलेलो संशय खरो ठरलो.

घरच्यांचो पूर्ण विरोध होतो… तुमचा दोघांचाही जा काही सुरू हा.. ता हैसरच थांबया असो दम दिल्यानी. दोघांमध्ये आता दुरावो इलो..

सरिताक माझी आणि माका सरिताची परिस्थिती चांगलीच कळत होती. दोघांचेही चेहरे सारक्याच सांगत होते. एक दिवस एसटीमध्येच सरिताशी बोललय.

”सरिता.. मी तुझ्याशिवाय रवाक शकनय नाय”

”माका..माहिती आसा.. माझी पण काय वेगळी गत नाय हा”

आता पुढे काय करुक व्हया ह्यो प्रश्न निर्माण झालो होतो. माझ्या मनात शिक्षण पुरा करून, पुढचा पुढे बघुया असो इचार इलो होतो. त्येच्याही मनात तोच इचार होतो, पण दोघांनीही एकमेकांका बोलून दाखऊक नव्हता. पुढे आमचा दोघांचा काहीच बोलना झाला नाय. त्यामुळे पुढची तीन वर्षा मनाक मुरड घालून दोघांनीही काढले. पण मनातला प्रेम काही आटाक नाय आणि याची दोघांकाही कल्पना होती.

आज मी पोलीस पाटील म्हणून काम पाहतंय.. तर सरिता आम्ही ज्या शाळेत शिकलव त्या शाळेत शिक्षिका आसा. दोघांनीही शिक्षण घेऊन घरच्यांचा मन वळवल्यांनी. सुरुवातीक खूप विरोधात जाऊचा लागला. पण जसा आमका कळला… तसा शेवटी घरच्यांकाही कळला की लग्नासाठी मुला मुलीचा ‘मन जुळाक व्हया…’

आज सरिता आणि मी खूप आनंदात आसव. आमच्या तीन वर्षांचा चेडू आणि आम्ही दोघा सुखान जीवन जगतव. काही वर्षा दुराव्याची गेली तरी माणसान ठाम आणि संयमी रवाक व्हया मग सगळे गोष्टी साध्य होतंत… सरिताच्या प्रेमान माका सगळा काही दिल्यान.. स्वतः कष्टाचा पाणी करुन दोघांनी गावात जागा घेवून स्वतःचो बंगलो बांधलो. आजही सरिताच्या कलमांची देखरेख करतंय.. आता पहिल्यासारख्या आंबे काढूक जमनत नाय.. दुसऱ्याकडून काढून घेऊचे लागतत..

आठवण झाली तर येवा आंबे खाऊक…कोकण आपलोच आसा..

समाप्त.

– तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित