प्राची अंकितशी फोनवर बोलत होती. दोघं त्यांच्या शाळेतील ओळखीपासून ते प्रेम जडेपर्यंतचा प्रवास उलगडत होते. खूप छान गप्पा रंगल्या होत्या. शाळेत दोघं एकाच वर्गात पण तेव्हा प्रेम वगैरे असं दोघांमध्ये काहीच नव्हतं. वर्गात दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवायचे. ते सगळं बालिश असतं असं त्या दोघांनाही ठावूक होतं. दहावीनंतर तर दोघांनाही वेगवेगळ्या कॉलेजात अॅडमिशन मिळालं त्यानंतर दोघांमध्ये केव्हाच बोलणं किंवा भेटणं झाल नव्हतं. दोघंही जॉबला लागल्यानंतर एकदा स्टेशनला जात असताना स्कायवॉकवर नजरानजर झाली आणि जागीच थांबले..पाच-सहा वर्षांनंतर दोघं समोरासमोर आले होते. येथेच दोघांचं बोलणं सुरू झालं…पुढे गाडी प्रेमाच्या ट्रॅकवरही वळली..हा सगळा प्रवास प्राची अंकितशी फोनवर बोलताना पुन्हा गिरवत होती. (त्याला सर्व ठावूक असतानाही)

”अरे..अंकित तुला आपली स्कॉयवॉकवरची भेट आठवतेय का रे. स्कूलफ्रेंड असूनही वेगवेगळ्या कॉलेजात अॅडमिशन मिळाल्यामुळे आपण दुरावलो गेलो होते. पण जॉबला लागल्यानंतर त्या स्कॉयवॉकने आपल्याला जवळ आणलं.”

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

“हो..सगळं अगदी व्यवस्थित ठावूक आहे मला आणि मी ते विसरणं शक्य आहे का प्राची? बऱ्याच वर्षांच्या अंतरानंतर आपली ओळख झाली होती. त्यामुळे खूपच गप्पा रंगल्या होत्या आणि त्या कधी संपणार नाहीत याची जाणीव झाल्याने आपण व्हॉट्सअॅपवर बोलण्याचं ठरवलं. त्यानिमित्ताने एकमेकांचे मोबाईल नंबर एक्चेंज झाले. पण तू हे आता आपल्या भूतकाळात का जातेयस?”
“कारण, मला आठवण येतेय आपल्या भूतकाळाची म्हणून.”

“अच्छा ठिक..बोल मग”

“व्हॉट्सअॅपवर तू आधी हाय पाठवलं होतं आणि how r u? whts going on? या मेसेजेस ऐवजी ‘ऐ…शाळेत आपल्या दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवायचे..आठवतंय का तुला?’ हा तुझा पहिला प्रश्न होता.”

“हो, आणि तू त्यावर लगेच..होकार देऊन पुढे थेट विषयाला हात घातलास. शाळेतलं जाऊ देत..आत्ताच काय अजूनही सिंगलच आहेस का? असं तू मला थेट विचारून मोकळीही झाली होतीस.”

“खरंतर दोघांनाही आपल्या सध्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती काढून घ्यायची होती आणि तसेच प्रयत्न आपण एकमेकांच्या प्रश्नांमध्ये करत होतो. म्हणून मी थेट विचारून खात्री करून घेतली.”

दोघांनाही त्यावेळी सिंगल असल्याची माहिती मिळाली होती आणि मग गाडी रुळावर येण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. खरंतर दोघांकडूनही त्यासाठी सिग्नल मिळत असल्याने एकमेकांच्या भावना समजण्यास प्राची आणि अंकितला वेळ लागला नाही. दोघांमध्ये सुरूवातीला तासंतास चालणारं चॅटींग भेटीपर्यंत येऊन पोहोचलं. मरिन ड्राईव्हवरच्या पहिल्या भेटीतच दोघांमध्ये तब्बल चार तास गप्पा रंगल्या आणि तेथेच दोघं प्रेमाच्या लाटेवर स्वार होऊन हातात हात घेऊन चंद्राकडे पाहात पुढची स्वप्न रंगवू लागले. एकमेकांचा हात पकडल्यानंतर दोघांनी एकमेकांकडे एकटक पाहिल्यानंतर दोघांच्या डोळ्यांनीच प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे प्रपोज वगैरे करण्याची गरजच भासली नाही.
दोघंही वेगवेगळ्या प्रोफेशनचे..वेगवेगळ्या कंपनीत कामाला. पण सुटीचा दिवस किंवा मग ऑफीसच्या वेळेनंतर भेटायचे. कधी समुद्रकिनारी तर कधी सीसीडी. शाळेच्या दिवसात या दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवणारी मित्रमंडळी आणि त्यावर दुर्लक्ष करणारे हेच दोघं आज बऱयाच वर्षांनंतरच्या भेटीनंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यावर दोघांनाही विश्वास बसत नव्हता. मूव्ही डेट..डिनर डेट असं सगळं दोघंही प्रेमाचं नातं एन्जॉय करत होते.

“ऐ..अंकित तू मला दिलेलं ते ऑफीस सरप्राईज आठवतं का रे? कसलं भारी होतं ते..मी कधीच विसरू शकत नाहीय ते”

“मी, ही. तुझ्याचसाठी केलं होतं मी ते..तुला खूप भारी वाटेल याची कल्पना होती मला. म्हणूनच ठरवून केलं होतं. तुला सरप्राईजेस आवडतात ना म्हणून.”

अंकितने प्राचीला खरंच खूप भारी सरप्राईज दिलं होतं. दोघंही वेगवेगळ्या ऑफीसमध्ये कामाला होते. अंकितला त्याचा जॉब बदलायचा होता. त्याने त्यासाठी नोकरी डॉट कॉमवर बायोडेटा अपडेट केला होता. त्यानुसार अंकितला जॉबसाठीचे मेल येत होते. त्यातला एक मेल प्राची ज्या कंपनीत काम करत होती त्याच कंपनीचा होता. फक्त डिपार्टमेंट वेगळं होतं. अपेक्षित इंक्रिमेंटही अंकितला मिळणार होतं. मग अंकितने ठरवलं. आपण प्राचीची कंपनी जॉईन करायची, पण तिला सांगायचं नाही. सरप्राईज द्यायच.

महिन्याभराच्या कालावधीनंतर अंकितचं प्राचीच्या कंपनीत जॉईन होण्यासाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती. तोवर अंकितने प्राचीला याची कुणकुण देखील लागू दिली नव्हती. अंकितच्या नव्या ऑफीसच्या जॉइनिंगचा पहिला दिवस. रोजच्या प्रमाणे दोघांमध्ये सकाळपासून व्हॉट्सअॅपवर बोलणं सुरू होतं. ”चल, मी ऑफीसला पोहोचलोय..लंच टाईममध्ये मेसेज करतो” असं म्हणून अंकितने चॅटींगला पूर्णविराम दिला होता. दोघांचेही डिपार्टमेंट एकमेकांपासून तसे लांब होते. त्यामुळे प्राचीला काही कळण्याचा मार्ग नव्हता. अखेर लंच टाईमवेळी अंकितने प्राचीला फोन केला..

“हाय प्राची..झालं का जेवण?”

“नाही रे..जातेय आता”

”चल, मग मी पण येतो”

प्राचीने नेहमीप्रमाणे अंकितचं बोलणं मस्करीत घेतलं.

”हो..का..येना मग..मी वाट पाहातेय”

”हे..बघ आलोच..तू हो पुढे”

”मी पोहोचले पण..आता डबापण उघडेन..चल जेवून घेते मी आता. जेवण झाल्यानंतर फोन करते..तूपण जेव आता”

”थांब..तुला शपथ आहे..मी आल्याशिवाय जेवू नको..”

”अंकित….काय झालंय तुला..ठिक आहेस ना..हे काय मधेच..?”

हे प्राची बोलत असतानाच अंकित त्याचा डबा घेऊन कॅन्टीनमध्ये दाखल झाला होता. अंकितला समोर पाहून प्राचीच्या हातातून मोबाईल खाडकन् खाली पडला..प्राचीसाठी खूप मोठं सरप्राईज ठरलं होतं…ते..

अंकितने लंच करत प्राचीला सर्व कहाणी सांगितली. त्यानंतर प्राची खूप खूष झाली होती. कारण दोघांनाही आता जास्तवेळ एकमेकांना देता येणार होता. एकत्र घरी जाता येणार होतं. दोघंही खूप खूश होते त्यादिवशी…पण सारंकाही मनासारखं होतं असं नसतं ना..

क्रमश:

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित