ओ..गाववाल्यांनु ऐकलात काय..राग आणि प्रेम या दोनच भावनांनी माणसाचो स्वभाव बदलता. कोकणातली माणसा फणसासारखी असतत असा म्हणतत..ता अगदी खरा असा. वरसून काटे असले तरी आतून रसाळ असतत. रागवतली पण उगच्यो उगीच राग धरून बसन्यातली नाहीत ती. काही झाला तरी स्वाभीमान सोडूची न्हाय. माझ्या आणि सरिताच्या बाबतीत ही असाच झाला. आम्ही दोघा एकाच गावचे..एकत्र लहानाचे मोठे झालो. तर राजेश माझो लहानपणापासूनचो मित्र. राजेशचे डोळे तपकीरी रंगाचे होते म्हणून त्याला घाऱया म्हणूनच हाक मारायचे. आमच्या दोघांच्याही घरची परिस्थिती सारखीच..एकच पँट घाल तीन-तीन वर्षा..आठवी ते दहावी अशी तीन वर्षा शाळेची नवीन पँट घेतलीच नव्हती, पण खिशात नाय दमडी आणि खावाची हा कोंबडी असा आमचो माज असायचो..तरी घाऱया माझ्यापेक्षा हुशार होता. परिस्थितीची जाण होती त्याका. त्यामुळे वर्गातल्या मुलींच्या डोळ्यात तो हिरो व्हतो. मी मात्र आपलो जेमतेम…सरिताचा घर माझ्या घरापासून तसा जवळच व्हता. त्यामुळे शाळेत एकत्र जायचो. वाटेत घाऱया भेटायचो. मी अभ्यासात जेमतेम असल्याचा सरिताक चांगला माहित व्हता म्हणून ती नेहमी माका मदत करायची. बेस्ट फ्रेंड झाली होती ती माझी.

आंब्याची कलमा होती त्यांची. मी सरिताच्या घरवाल्यांना आंबे काढून देऊचय..मोबदल्यात सरिता माका अभ्यासात मदत करायची आणि तिची आई पिशवीभर आंबे पण देऊची. त्यामुळे माझ्या घरचे पण काही बोलूचे नाय..उलटा सरिताचा आणि तिच्या घरवाल्यांचा कौतुक व्हायचा माझ्या घरी. सरिता हुशार होती ना माझ्यापेक्षा म्हणून.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
Gold Silver Price on 1 March
Gold-Silver Price on 1 March 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत

दहावीचं वर्ष असताना आम्ही एकत्रच अभ्यास करायचो. सरिताच्या पडवीत अभ्यासाक बसायचो. एक दिवस सरिताच्या पडवीत लाल मिरची भाजूचा काम चालला होता.

“कमलेश, चल व्हाळाजवळ जाऊन अभ्यास करू.. माझे डोळे मिरचीच्या भाजणीने झोंबाक लागले.”

माझेही डोळे झोंबायला लागले व्हते. म्हणून सरिताक मीही चल म्हटलंय. गावाच्या व्हाळाजवळ मोठी झाडा होती. म्हणून सावली असायची. एका आंबाच्या झाडाला टेकून आम्ही बसलो. बीजगणिताचा घरचा अभ्यास बाकी व्हतो तो करात सुरूवात केली. सरिताने अडलेली उदाहरणा समजवून सांगल्यान. नंतर पुढची दोन उदाहरणा मला सोडवाक दिली.

“ही, दोन उदाहरणा सोडव कमलेश..तोवर मी व्हाळावर टाईमपास करतय”

मी होय म्हटलंय. आधीची गणिता बघून बघून मी ती सोडवाक घेतलंय.

थोड्यावेळान बघतंय तर वलीचिंब पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत भिजलेली सरिता समोरून चालत इली. तिच्याकडे बघतच बसलंय.. सरितान पिवळ्या रंगाचो पंजाबी ड्रेस घातलो व्हतो. तो पूर्ण भिजलो. खांद्यावर ओढणीपण नव्हती..ती हातात घेऊन त्या पिळत पिळत चालत इला. पाण्याने ओलिचिंब झालेला सरिता..वले केस आणि चेहऱयावर वल्या केसाची एक बट.. माझी नजर हटेनाच..वल्या पायांनी माझ्याजवळ चालत येणारी सरिता आज वेगळीच दिसत व्हती…तिचं हे रुप मी पहिल्यांदा पाहिल्याने मी चलबिचल झालो व्हतो. ती जशी जवळ येत इली तशी मनात धडधड वाढली. मी एक टक तिच सौंदर्य टापून पाहात व्हतंय. जवळ इली तसा सरितानं रडगाणं सुरू केल्यान. ओढणी जोरजोरात पिळान ती राग व्यक्त करत व्हती. मी भानावर इलय.

”काय गो..भिजलीस कशाक? काय झाला” मी जागेवरून उठलय आणि तिला विचारलंय.

”मेला..माझा पाय व्हायाळाच्या दगडावरून घसरलो..आडवेच पडले पाण्यात”

मी जोरजोरात हसू लागलाय. तिचा राग आणखीच वाढलो. ता तसाच तिथून निघून गेला.

”अगो..काय झालं..थांब. सरिता…तूझी बॅग..पुस्तका”

”मरुदेत..नको मला”

मी भराभर सगळी पुस्तका भरली आणि निघालय. सरिता पुढे निघून गेली व्हती.
सरिताच्या घरी पोहोचलंय. पडवीतून आत पाहिलंय तर तिची आई तिला वरडत व्हती. सरिता तोंडाक कुलूप लागल्या गत काही न बोलता घरात भिंतीवर टांगलेल्या आरशात पाहून आपले ओले केस एका बाजूक सोडून ते विंचरत होती. मी आलोय हे तिने पाहिलेलं. मला पाहताच त्या आत निघून गेला.

”सरिता..तुझी पुस्तकां ठेवलीत”

तिची पुस्तक पडवीतच ठेवून मी वाटेला लागलंय. घरी परतत असताना यावेळी माझी पावलां खूप हळूहळू चालत होती. समोर सरिताचाच चेहरो दिसत होतो. ह्योच माझो पहिलो आडवाटेतलो दगड ठरलो होतो. पुढे हळूहळू माझ्या भावनेक बळ मिळत गेला. माझा जास्तीत जास्त वेळ सरितावांगडान जात हुता.
——————————-
दहावीनंतर एकाच कॉलेजात शिक्षण. मुंबईतल्या काकानं कॉलेजात जाण्यासाठी माका एक लाल रेकट्याचो शर्ट पाठवलेलो. तो सरिताक जाम आवडलो हुतो. अजूनही जपून ठेवलय त्यो शर्ट. कॉलेजात जाण्यासाठी एसटीनं प्रवास करुचो लागो. मग काय दोघं एकाच वेळी निघायचो..शाळेचो धडो आता कॉलेजातही तसो…च सुरू…

एकदा सरिताच्या बापसान त्यांच्या कलमाचे आंबे काढूक बोलावलान. मी हरवेळी सारखा गेलय. सरिताच्या घरी जाऊन आवाज दिलय.

”दादांनु मी आलय..जायचा असा ना”

”व्हय रे..कमल्या थांब इलय.” आतून सरिताच्या बापसाचो आवाज इलो.

”काय रे..कलमा चांगलीच धरली हत यावेळेस..खूप वेळ लागात..काय खाऊक आणलास काय सोबत” सरिताच्या आईनं पडवीत येऊन माका विचारल्यान.

”नाय..घरीच जाऊन खाईन मी”

मी आंबे काढूसाठी सगळी तयारी करून निघालय. दुपार एक वाजेपर्यंत कलमांचे आंबे काढुचा काम सुरू व्हता..पण त्या काय पुरा झाला नाय..पोटाक झळ पडू लागली..थो़डा वेळ खाली बसान आराम करायचा ठरवलंय..इतक्यात समोर पाहातय तर धक्कोच बसलो. अनपेक्षित घडला..सरिता माझ्यासाठी डबा घेऊन इला.

”कमलेश..भूक लागली असेल ना..आईन घावणे पाठवलेत..चल खाऊन घे.”

सरिता जेवणासाठी आता जागा शोधीत हुता. जमीनीवर अंथराक काही मिळत नव्हता. मग तिने ओढणीच खाली अंथरण्याचं ठरवलं. आमराईत जमिनीवर स्वत:ची ओढणी अंथरून सरितान डबो उघडून सगळी तयारी सुरू केल्यान. मी जवळच्या हिरीवरचं पाणी काढून हात धुवून घेतलंय..

एका बाजूक पाय दुमडून बसलेली सरिता डब्यातून एकएक करून घावणे काढत हुती. सोबत काळ्या वाटाण्याची उसळ. तोंडाक पाणीच सुटला…डोळ्यावर येणारे केस कानामागे नेऊन घावण्याचो घास घेणाऱया सरितात मी थयसरच बसुन पुन्हा टक लाऊन पाहू लागलय.

”कलमा खूप धरलीत ना यावेळी..चांगलो धंदो होईल आबांचो.”

”हमम” मी घावणे खात खात सरिताच्या प्रश्नांना उत्तरं देत होतो. पण सरिताचं सौंदर्य माका विचलीत करत हुता. सारखा पुढे पुढे येऊन त्रास देणाऱया केसांका तिनं माझ्याशी बोलता बोलता एका बाजूला केलान…तितक्यात तिच्या मानेवरच्या तिळानं माझं लक्षवेधून घेतलं..माका आता रहावेनाच..

”सरिता..खूप छान दिसतेयस..”

वेगळाच विषय सुरू असताना माझ्या अशा अचानक मध्ये बोललल्यानं सरिता बिचारी दचकली..

”कमलेश…” असं बोलून तिने आधीच बोलणं थांबवून पटकन माझ्याकडे एक नजर टाकली आणि नंतर लाजेनं मान खाली घातली. खाली अंथरलेल्या ओढणीकडे तिचे दोन्ही हात गेले.

सरिता शहारला..हाताच्या मुठीने तिने अंथरलेली ओढणी घट्ट पकडल्यान..तिला ओढणी हवीय हे माका कळला हुता. पण त्याच खाली अंथरून त्यावर आपण जेवायला बसल्यान तिची पंचाईत झाली हुती.

सरिताची हनुवटी वर करून तिला माझ्याकडे बघण्यासाठी मीच पुढाकार घेतलय.

”कमलेश…काय करतोयस…” सरिता आता खूप लाजत होती. ती पटकन जागेवरून उठली आणि पुढे जाऊन पाठमोरी उभी -हवली. मी सर्व आवरून तिचो डबो पिशवीत भरलंय आणि अंथरलेली ओढणी झटकून त्या नीट करून सरिताच्या समोर गेलय. ती पुन्हा मागे वळली.

”अगो..सरिता डबा तर घे..”

सरिताच्या हातात डबा दिलय..तिची नजर अजूनही खालीच हुती. माझ्या हातातली ओढणी सरळ करून तिच्या दोन्ही खांद्यावर मी व्यवस्थित टाकलय आणि…

”सरिता..माका तू आवडतेस..खूप सुंदर दिसतस”
असं म्हटल्यार सरिताच्या चेहऱयावरच लाजणं माका स्पष्ट दिसत हुता. सरिता डब्याची पिशवी घेऊन थैसून निघान गेला. पण मी थैसरच उभा -हवान तिच्याकडे पाहात हुतय. पुढे जाऊन सरितान मागे नजर टाकल्यान आणि ती हसली…
हीच माझ्या प्रेमाची कबुली ठरली हुती..

(क्रमश:)

तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित