खरे तर वर्षां ऋतूमध्ये येणाऱ्या श्रावणाची सुरुवात ग्रीष्मातच होते. कारण श्रावणामध्ये निसर्गात जे बदल होतात, त्यासाठीची पूर्वपीठिका तयार करण्याचे काम ग्रीष्मानेच केलेले असते. उष्णकटिबंधीय देशांमध्येच मान्सूनचे हे अनोखेपण लक्षात येते. श्रावण ही अशा प्रकारे भूगोल आणि परिणामी निसर्गाचीच एक वेगळी देण आहे. उन्हाळ्यातील ग्रीष्मझळांच्या काळात पाणी कमी वापरले जावे म्हणून निसर्गामध्ये पानगळ होते. पाणी कमीत कमी वापरले जावे याचबरोबर जमिनीमध्ये असलेल्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे असेही एक निसर्गाचे आगळे गणित असते. ज्येष्ठ आणि आषाढातील तुफान पाऊस त्या पालापाचोळ्यातील कडकपणा घालवून त्यात ओलावा आणतो. श्रावणात हा पालापाचोळा वेगात कुजण्यास सुरुवात होते. ‘क्षणात येते, सर सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’ हे काव्यपंक्तींमधील वातावरणच त्यास कारणीभूत ठरते. अगदी भूगोलाच्या संदर्भात बोलायचे तर वर्षांऋतूचे सुरुवातीचे दोन महिने हे उन्हाळ्यामध्येच येतात. कारण तोपर्यंत सूर्य उत्तर गोलार्धातच असतो. नंतरचे दोन म्हणजे हिवाळ्याची सुरुवात. २३ सप्टेंबरनंतर तांत्रिकदृष्टय़ा उन्हाळा संपतो. श्रावणातील त्या ऊन आणि पावसाच्या लपंडावाचा परिणाम तापमानातील वेगात होणाऱ्या बदलांवर होतो आणि आद्र्रता व उन्हाच्या एकत्रित परिणामाने कुजलेल्या पाचोळ्यावर बुरशी येते, कुत्र्याची छत्री अर्थात अळंबी दिसू लागते आणि पलीकडे त्याच वेळेस त्या पाचोळ्याची किंवा काटक्यांची माती होण्याची प्रक्रिया वेगात सुरू होते!

माती हा खरे तर तसा निर्जीव घटक. दगड किंवा विविध खनिजांच्या चुऱ्यापासून तिची निर्मिती होते, पण कुजत जाणारा पालापाचोळा त्या मातीमध्ये जिवंतपणा आणतो. कारण तिथे सूक्ष्म जीवांची नवीन सृष्टी वावरू लागते. हे सूक्ष्म जीव एवढे सूक्ष्म असतात की, त्यातील अनेक साध्या नजरेलाही दिसत नाहीत. त्या पाचोळ्यामध्ये असलेले वनस्पतीज आणि प्राणीज अशा दोन्ही घटकांचे विघटन याच श्रावणात सर्वाधिक वेगात होते. यालाच वैज्ञानिक भाषेत मातीला पुनरुज्जीवन मिळणे किंवा बोलीभाषेत माती जिवंत होणे असे म्हणतात. मातीचा वरचा एक ते दीड इंचाचा हा थर खूप महत्त्वाचा असतो. यामध्येच ही जीव आणि वनस्पतींची सूक्ष्म सृष्टी अस्तित्वात येते.. माती सजीव होते. हाच मातीचा कसदारपणाही. आपण म्हणतो अलीकडे भाज्यांना पूर्वीची चव नाही, त्या वेळेस हमखास समजावे की, ज्या मातीतून भाजी येते आहे, त्या मातीतील जिवंतपणा कमी झाला आहे. या जिवंतपणाचा असा थेट संबंध श्रावणाशीच जोडलेला आहे.

sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा

एखादी बी रुजण्यासाठीही जमिनीमध्ये विकर असावे लागतात किंवा एक विशिष्ट वातावरण असावे लागते. पावसात ते तयार होते आणि जोरदार वाढीसाठीचे विकर आणि इतर घटक श्रावणात मुबलक प्रमाणात मिळतात. मग खालच्या बाजूस मूळ धरणे आणि वरचे खोडाचे वाढणे हे दोन्ही एकाच वेळेस वेगात सुरू होते. त्यासाठी सर्वाधिक पोषक महिना म्हणजे श्रावण. फुटलेल्या अनेक कोंबांनी जीव धरलेला असतो.. पण वेगात वाढण्यासाठीचे पोषक वातावरण प्राप्त होते ते मात्र श्रावणामध्येच. आषाढात पूर्णपणे कुंद वातावरण असते. आकाश ढगाळलेले असते. मेघाच्छादित आकाश मग सूर्यप्रकाशच खाली पोहोचू देत नाही. (अर्थात आता वातावरणबदलाचेही आपण अनेक परिणाम भोगत आहोत, परिस्थिती थोडी बदललीही आहे.) ..पण श्रावणात मात्र मेघ दूर होतात आणि मग येणारा सूर्यप्रकाश या नव्या पालवीला, कोंबांना वेगात वाढण्याची नवीन संधी देतो.. तोपर्यंतचा त्यांचा प्रवास सुरू असतो तो त्या बियांमध्ये असलेल्या अन्नाच्या ऊर्जेवर! आता श्रावणात संधी मिळते ती प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून स्वत:चे अन्न स्वत तयार करण्याची. मग जोरात व जोमात वाढ सुरू होते दोन्ही दिशांनी वरती व खाली. फक्त एकाच झाडाची नव्हे तर सर्वच झाडांची. वरती फांद्यांचा पसारा वेगात वाढतो आणि खाली पाळेमुळेही वेगात पसरतात.. जणू काही या हिरव्या वाढीसाठी झाडाझाडांमध्ये एक वेगळीच स्पर्धा सुरू होते.. परिणामी श्रावणात आपल्याला सर्वत्र हिरवाईच नजरेस पडते आणि कवी म्हणतात.. श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे! ..म्हणूनच तर वनस्पतींच्या वेगातील वाढीसाठी जी ग्रीन हाऊस तयार केली जातात त्याच्या आतील वातावरण हे नेमके श्रावणासारखेच असते. झाडांना नवे चतन्य प्राप्त होते आणि पुनíनर्मितीचा हा सोहळा श्रावणात अधिक रंगत जातो.

श्रावण हा वृद्धीचा कालखंड आहे. याचा कालावधीत अधूनमधून येणाऱ्या पाऊसधारांमुळे हवेत धुळीचे प्रमाण कमी असते आणि वनस्पतींचे सचल स्नान सतत सुरू असत. पानांवर धूळच नसल्याने त्या लख्ख पानांमधून प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया अतिशय वेगात व कोणत्याही आडकाठीविना पार पडते. याच कालावधीत झाडे आपापला हिरवाईचा पिसारा फुलवण्याचा सर्वाधिक प्रयत्न करतात. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर झाडांमधील जैवरासायनिक प्रक्रिया श्रावणातच सर्वाधिक परमोच्च वेगात होते. खालती मुबलक पाणी असते आणि वरती ऊन.

श्रावणात बऱ्याचशा एकवर्षीय वनस्पती- वेली यांना फुले येतात आणि मग आपल्याला तोंडली, भोपळा, कारली, कंटोळी, कोहळा, पडवळ खायला मिळतात. ऑक्टोबरनंतर त्यांची वृद्धी थांबते. अर्थात आता हायब्रीडच्या जमान्यात अनेक भाज्या वर्षांच्या बाराही महिन्यांत मिळतात, त्यामुळे त्याचे फारसे अप्रूप आपल्याला राहिलेले नाही.

पठारही याच कालावधीत फुलू लागतात. गवतांना तुरे येतात आणि परागीभवनाला सुरुवात होते. परागीभवनामध्येच बीजनिर्मितीची मुळे दडलेली असतात. गवत आणि लहान वनस्पतींचे बहुतांश परागीभवन श्रावणातच होते, कारण हा कीटकांचा सर्वाधिक वेगवान वावर असण्याचा कालखंड. एक प्रजनन चक्र सृष्टीत वेगात सुरू असते. याच वाढत चाललेल्या झाडांच्या पानांवर अनेक कीटक अंडी घालतात, त्यातून अळ्या बाहेर येतात त्या याच वनस्पतींवर पोसल्या जातात आणि मग पावसाळा संपेपर्यंत हे कीटक उर्वरित कालावधीसाठी लपण्याच्या जागा शोधू लागतात. काही तर जमिनीत शिरणेच पसंत करतात.

पावसाळ्याची वर्दी देणाऱ्या बेडकाच्या पिल्लांनी पावसाळ्यात िडभकाच्या पुढची शेपटीवाल्या बेडकाची अवस्था गाठलेली असते. वाढलेल्या डासांना गट्टम करण्याचे काम बेडूक करत असतात. दुसरीकडे उभयचर प्राण्यांमध्येही असेच सत्र सुरू असते. जमिनीवरचे खेकडे, त्यांची पिलावळही जंगलात पळताना दिसते. पावसाळा संपताना बेडूक शीतनिद्रेची जागा शोधतात आणि जमिनीत गुडूप होतात!

कीटकांवर जगणारे बगळे, खंडय़ा यांसारखे पक्षी श्रावणात सर्वत्र नजरेस पडतात. जमिनीवर चरणारे ससे, हरीण, गाईगुरं यांना मुबलक चारा उपलब्ध असतो. ती नंतर येणाऱ्या विणीच्या हंगामासाठीची त्यांची बेगमी असते. ते धष्टपुष्ट होतात, येणाऱ्या ऋतुमानाला व निसर्गचक्राला सामोरे जाण्यासाठी! यापकी अनेकांचा विणीचा हंगाम ऑक्टोबरनंतर असतो.

रात्रीच्या वेळेस जंगलात फिरताना खेकडे आणि सापांची लहान पिल्ले यांचा वावर खूप मोठा पाहायला मिळतो. ससेही मोठय़ा प्रमाणावर दिसतात. हिरवा कोवळा पाला हा अनेकांचा महत्त्वाचा आहार असतो, तर काहींसाठी त्यावर चरायला येणारे भक्ष्य! सृष्टिचक्र या श्रावणात सर्वाधिक वेगवान असते. जमिनीवरच्या कासवांपासून ते महाकाय असलेल्या हत्तींपर्यंत सारे जण चतन्य संचारल्याप्रमाणे श्रावणात वावरत असतात. खूप वर आकाशातून उडणाऱ्या गरुडांसारख्या पक्ष्यांसाठीही हा चंगळ असलेलाच ऋतू आहे, कारण मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले भक्ष्य.

केवळ सापच नव्हे, तर काही प्राणी, कीटकही कात टाकतात हे आपल्याला ठाऊक असते; पण या श्रावणात काही झाडेही कात टाकताना दिसतात. त्याची जुनी झालेली साल गळून पडते. सालीचे प्रमुख कार्य म्हणजे खोडाचे संरक्षण, पण श्रावणातील वातावरणामुळे बाह्य़ संरक्षणाची फारशी गरज भासत नाही. अशा वेळेस कडुिनब, अर्जुनासारखे वृक्षही वेगळ्या प्रकारे कात टाकून तुकतुकीत दिसू लागतात.

असा हा सृष्टीला नवचतन्य देणारा अपूर्व सोहळा सुरू असताना, आपणही रोजमर्राच्या आयुष्यातील ताणतणावांना सोडचिठ्ठी देऊन निसर्गसुक्त अंगात भिनवत चतन्यमयी व्हावे!

या चतन्यमयी निसर्गसूक्तासाठी शुभेच्छा!
vinayak-signature
विनायक परब – @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com