ठाणे येथील कळवा भागात दहा वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या एकास कळवा पोलिसांनी अटक केली आहे. दीपक ओम उलगी (३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो कळवा भागात राहतो. १४ डिसेंबरला याच भागात राहणारी दहा वर्षीय मुलगी बाजारात भाजी खरेदीसाठी गेली होती. भाजी घेऊन घरी परतत असताना इमारतीच्या जिन्यामध्ये पाठीमागून येऊन दीपकने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुरुवारी मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दीपकला अटक केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.