३३४ पदांना अखेर मान्यता; वेतन सुरू करण्याचे आदेश
राज्यातील उच्च माध्यमिक विभागातील पायाभूत पेक्षा वाढीव ३३४ पदांच्या मान्यताप्राप्त शिक्षकांच्या वेतनासाठी अखेर शासनाने १३ कोटी ९२ लाख २० हजार रुपयांची तरतूद आज मंजूर केली असून तातडीने वेतन सुरु करण्याचे आदेश आज शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी शिक्षण संचालकांना दिले आहे याबाबत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी पाठपुरावा केला होता असे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
उच्च माध्यमिक विभागातील पायाभूत पेक्षा वाढीव सुमारे ९३६ पदांना शासनाने मान्यता दिली होती तथापि या पदांवर काम करणार्या शिक्षकांसाठी शासनाने वेतन अनुदानासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद केली नव्हती. कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी याबाबत मंत्रालयाच्या ६ व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशाराही शासनाला दिला होता. तसेच वारंवार पत्रव्यवहार करून व मंत्री महोदयांशी कनिष्ट महाविद्यलयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकारम्य़ांसह शासनाकडे आग्रही भूमिका आमदार रामनाथ मोते यांनी घेतल्याने हा प्रश्न आता सुटला असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
कनिष्ट महाविद्यलयीन शिक्षकांच्या संघटनेबरोबर मंत्रालयात झालेल्या चर्चेत शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव नंदकुमार व शिक्षण आयुक्त पुरषोत्तम भापकर यांनी ३३१ मान्यताप्राप्त शिक्षकांना ऑक्टोबर २०१५ पासून वेतन देण्यासंदर्भात निष्टिद्धr(१५५)त आदेश काढण्यात येतील अशी ग्वाही दिली होती परंतु शिक्षण संचालक कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे प्रस्ताव पाठविले गेले नव्हते त्यामुळे शिक्षकांना वेतन सुरु होणार कि नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी या विषयाचे गांभीर्य शिक्षणमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले होते.
आमदार रामनाथ मोते यांच्या पाठ्पुराव्यामुळे आता मात्र वेतन सुरु करण्याचे आदेश निघाल्याने अनेक वर्षांपासून उपाशी पोटी काम करण्यार्या शिक्षकांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.