उपनगरी रेल्वेच्या प्रथम आणि द्वितीय वर्गाच्या मासिक आणि त्रमासिक पासचे भाडे गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार २२ जानेवारीपासून लागू होणारे किमान अंतरासाठीचेही भाडे वाढले असले तरी मासिक आणि त्रमासिक पासामध्ये १६ ते २० किमी अंतरामधील स्थानकांच्या दरात मात्र कपात झाली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते घाटकोपर अंतराचा मासिक अथवा त्रमासिक पास हा १५ ते ४५ रुपयांनी कमी झाला आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते शीवपर्यंतचा पास मात्र वाढला आहे. रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या भाडेवाढीनंतर आता अधिकृतरित्या मासिक आणि त्रमासिक पासाचे दर जाहीर करण्यात आले आहेत. सर्वच अंतराच्या स्थानकांचे दर वाढले असले तरी १६ ते २० किमीच्या अंतरातील स्थानकांचे दर कमी झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. प्रथम वर्गाच्या दरात मात्र अशी कपात झाली नसून मासिक पासात पाच तर त्रमासिक पासामध्ये १० रुपयांची सरासरी वाढ झाली आहे.मध्य रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या पासाचे दर पुढीलप्रमाणेस्थानके मासिक त्रमासिकसीएसटी-भायखळा ८५ २३०सीएसटी-दादर ८५ २३०सीएसटी-कुर्ला ११५ ३२०सीएसटी-घाटकोपर ११५ ३२०सीएसटी-ठाणे १९० ५२५सीएसटी-डोंबिवली २६५ ७२५सीएसटी-कल्याण २८० ७७०सीएसटी-कसारा ४४५ १२२०सीएसटी-कर्जत ३५५ ९७५सीएसटी-वाशी २४० ६७५सीएसटी-पनवेल ३३५ ९२५मध्य रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या पासाचे दर पुढीलप्रमाणेस्थानके मासिक त्रमासिकसीएसटी-भायखळा २९० ७९०सीएसटी-दादर २९० ७९०सीएसटी-कुर्ला ४९५ १३५५सीएसटी-घाटकोपर ४९५ १३५५सीएसटी-ठाणे ६४५ १७६०सीएसटी-डोंबिवली ८५० २३२०सीएसटी-कल्याण ९५५ २६१०सीएसटी-कसारा १७२० ४६७५सीएसटी-कर्जत १४६० ३९७०सीएसटी-वाशी ७०० १९५०सीएसटी-पनवेल १०२५ २८४०पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या पासाचे दर स्थानके मासिक त्रमासिकचर्चगेट-एल्फिन्स्टन रोड ८५ २३०चर्चगेट-दादर ११५ ३२०चर्चगेट-वांद्रे ११५ ३२०चर्चगेट-अंधेरी १९० ५२५चर्चगेट-कांदिवली १९० ५२५चर्चगेट-बोरिवली १९० ५२५चर्चगेट-भाइंदर १९० ५२५चर्चगेट-वसई रोड २८० ७७०चर्चगेट-नालासोपारा २८० ७७०चर्चगेट-विरार २८० ७७०पश्चिम रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या पासाचे दर स्थानके मासिक त्रमासिकचर्चगेट-एल्फिन्स्टन रोड २९० ७९०चर्चगेट-दादर ४२५ ११६०चर्चगेट-वांद्रे ४२५ ११६०चर्चगेट-अंधेरी ५६५ १५४०चर्चगेट-कांदिवली ६४५ १७५५चर्चगेट-बोरिवली ६४५ १७५५चर्चगेट-भाइंदर ७८५ २१३०चर्चगेट-वसई रोड ९५५ २६००चर्चगेट-नालासोपारा १०२० २७८०चर्चगेट-विरार १०२० २७८०