जूनमध्ये पाच तर जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्येकी सात दिवस उंच लाटांसह भरती
mv02समुद्राला येणारी उधाण भरती आणि त्याच वेळीस मोठय़ा प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली तर मुंबई जलमय होते, हा आजवरचा अनुभव आहे. यंदाच्या वर्षी जून, जुलै, ऑगस्ट या पावसाळय़ाच्या तीन महिन्यांत १९ दिवस अशा मोठय़ा भरतीचे असून या दिवशी समुद्रातील पाण्याची उंची नियमित पातळीपेक्षा साडेचार मीटरने वाढण्याची व उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे. या पाश्र्वभूमीवर या दिवशी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन सर्व प्रशासकीय यंत्रणा तसेच नागरिकांना करण्यात आले आहे. समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीच्या वेळी उंची (जी मीटरमध्ये देतात) ती भरतीच्या पाण्याची उंची असते. ती समुद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची नसते, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.