येथील रायलादेवी परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या विचित्र अपघातात मोटारसायकलस्वार आणि एक पादचारी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली. मृत मोटारसायकलस्वाराचे नाव अमोल भोर (२५), तर पादचाऱ्याचे नाव मदन नागवेकर (५९) असे आहे.
या घटनेत अवधूत तावडे हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल आणि अवधूत हे दोघे मोटारसायकलवरून किसननगर येथून ठाणे स्थानकाकडे जात होते. त्या वेळी रायलादेवी तलावाजवळ भरधाव मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने त्यांनी मदन यांना धडक दिली आणि ते दोघेही समोरील ट्रकवर जाऊन आदळले. या प्रकरणाची श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.