क्रीडापटू , कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नोकर भरतीमध्ये क्रीडापटूंसाठी २ टक्के पदे आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. बेस्ट उपक्रमात अनेक कलावंत, अभिनेते व क्रीडापटू आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे बेस्टच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या कर्तृत्ववान कर्मचाऱ्यांसाठी बेस्टने निधी उभारावा, तसेच नोकर भरतीमध्ये क्रीडापटूंसाठी २ टक्के पदे आरक्षित असावीत, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी केली. राज्य सरकारच्या नोकर भरती धोरणात क्रीडापटूंसाठी नेमकी काय तरतूद आहे याची माहिती घेऊन नोकर भरतीत क्रीडापटूंसाठी २ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतील, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी स्पष्ट केले.