मुंबई- पुणे दृतगती मार्गावर खालापुर जवळ झालेल्या भिषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ४ जण जखमी झाले. पुण्याहून मुंबईकडे जाण्याऱ्या टेम्पोला मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींवर नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बांधकामाचे साहीत्य आणि आठ कामगारांना हा टेम्पो कर्नाटक मधून मुंबईच्या दिशेने चालला होता. मात्र खालापुर जवळील टेंभरी गावाच्या हद्दीतून जात असतांना टेम्पोचा टायर सोमवारी पहाटे एकच्या सुमारास पंक्चर झाला. पंक्चर झालेल्या टेम्पोचा टायर बदलण्यासाठी चालकाने गाडी साईड पट्टीला लावली होती. यावेळी गाडीतील आठ कामगार टेम्पो लगतच्या रस्त्यावर बसले होते. यावेळी मागून अतिवेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. हि धडक येवढ्या जोरात होती कि टेम्पो रस्त्यालगत बसलेल्या कामगारांना चिरडत बाजुच्या शेतात जाऊन पडला.
यात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एका कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर चार कामगार गंभिररीत्या जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये हलदार भगवान महतो (वय-४२) यल्लप्पा पुजारी (वय-३५) आणि सिद्देश मोहन पाटील (वय-२५) या तिघांचा समावेष असून एकाची मृताची ओळख अद्याप पटली नाही.
महत्वाची बाब म्हणजे दोन वर्षापुर्वी खालापुर जवळील टोल फाट्याजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पो ड्रायव्हलरला असाच अपघात झाला होता. यात २७ जणांचा बळी गेला होता. खालापुर जवळील टेंभरी येथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)