गेल्या ६६ वर्षांत अचूक बातम्या, जीवनाच्या सर्वागाला स्पर्श करणाऱ्या पुरवण्या आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या आधारावर ‘लोकमान्य, लोकशक्ती! – लोकसत्ता’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. नव्याची कास धरतानाही ‘लोकसत्ता’ने नवमाध्यमांमध्ये आपली घोडदौड कायम ठेवली आहे. म्हणून अल्पावधीतच ‘लोकसत्ता’च्या ‘फेसबुक पेज’ला http://www.facebook.com/LoksattaLive http://www.facebook.com/LoksattaLive  पाच लाख वाचकांनी पसंती दर्शवली आहे.
या वर्षी मार्च महिन्यातच ‘लोकसत्ता’ने फेसबुकवर दोन लाख लाइक्सचा टप्पा पार केला होता. परंतु, अवघ्या पाच महिन्यांतच तब्बल तीन लाख नवीन वाचक ‘लोकसत्ता’शी फेसबुकच्या माध्यमातून जोडले गेले आहेत.
वाचकांची संख्या वाढत असताना पेजवरील संवादही वाढत आहे. बातम्या, संपादकीय, विशेष लेख, व्यंगचित्र, नेटकौल, सुविचार, लोकोपयोगी माहिती आणि विविध उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे.
विशेष म्हणजे पेजची सरासरी रेटिंग ही पाचपकी ४.२ स्टार अशी आहे. जवळपास पाच हजारांहून अधिक वाचकांनी आपला अभिप्राय या पेजवर नोंदवला आहे, तसेच तीन लाखांहून अधिक वाचक या पेजवर सतत ‘अॅक्टिव्ह’ असतात. तसेच तब्बल ८५ टक्के वाचक हे १६ ते ३५ या वयोगटातील असून, भारताबाहेरील मराठी वाचकही मोठय़ा संख्येने आहेत.
मराठी वर्तमानपत्रांच्या पेजपकी फेसबुकतर्फे ‘व्हेरिफाइड’ होण्याचा मानही सर्वात आधी ‘लोकसत्ता’लाच मिळाला होता. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वाचे मन:पूर्वक आभार!