ओशिवारा परिसरात कारने दिलेल्या धडकेत पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. संदीप कोळेकर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
संदीप आपल्या आजी, आजोबा आणि आईसह आनंदनगरच्या रस्त्यावरुन घरी परतत होता. त्यावेळी रात्री साडेदहाच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका भरधान कारने या कुटुंबाला जोरात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात पाच वर्षांचा संदीप दूर फेकला गेला. संदीपला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अपघातात संदीपचे आजोबा गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  या अपघाताप्रकरणी कारचालक इंद्रजित मरोल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.