मुंबईतील भांडूप परिसरात आपल्या राहत्या घरात एका चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ५८ वर्षीय इसमास पोलिसांनी अटक केली. रविवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेत घरी एकटा असताना आरोपीने चॉकलेट देतो अशी फूस लावून शेजारी राहणाऱ्या लहान मुलीस घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आजुबाजुच्या लोकांनी आरोपीच्या घरी धाव घेऊन त्याला पकडल्याचे भांडूप पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पी. आर. चव्हाण यांनी सांगितले. रविवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली असून, मुलीच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालाची वाट बघत असल्याची माहिती त्यांनी दिली.