‘हिट अ‍ॅण्ड रन’ची प्रकरणे चर्चेत असतानाच अंधेरी परिसरात एका ७४ वर्षीय चालकाच्या भरधाव वाहनाने सहा जणांना धडक दिली. यात रस्त्यावर झोपलेले पती-पत्नी, दोन लहान मुली आणि दोन तरुण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
उपनगरातील सर्वात वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंधेरी परिसरात शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला.
श्रीचंद पंजाबी या ७४ वर्षीय वाहन चालकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर श्रीचंद यांनी घटनास्थळाहून पळ काढल्याचे समजते. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.