राकेश मारिया यांची मुंबई आणि विजय कांबळे यांची ठाणे आयुक्तपदी नियुक्ती करताना राज्यातील एकूण ६८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सहपोलीस आयुक्त सदानंद दाते (गुन्हे), धनंजय कमलाकर (कायदा आणि सुव्यवस्था), विवेक फणसळकर (आस्थापना), बी. के. उपाध्याय (वाहतूक) अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. हिमांशू राय (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य दहशतवादविरोधी पथक), के. एल. बिष्णोई (कायदा व सुव्यवस्था), संजय बर्वे (प्रशासन) हेमंत नगराळे (नियोजन व समन्वय) टी. ए. चव्हाण (राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ), परमबीर सिंग (विशेष पोलीस महानिरीक्षक, राखीव पोलीस बल) आदी ठिकाणी बदल्या केल्या गेल्या आहेत.
नवीन अतिरिक्त आयुक्त
*मधुकर पांडे (मध्य प्रादेशिक),
*मिलिंद भारांबे (प. प्रादेशिक)
*खालिद कैसर (वाहतूक)
*ब्रिजेश सिंह (उत्तर प्रादेशिक)
मुंबईत आलेले उपायुक्त
*पी. व्ही. होळकर
*के. एम. एम. प्रसन्ना
मुंबईतून बदली झालेले पोलीस अधिकारी
*प्रवीण साळुंखे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)
*नवल बजाज (संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी)
*सुनील पारसकर ( पोलीस उपमहानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई)
*विश्वास नांगरे-पाटील (पोलीस उपमहानिरीक्षक, लाचलुचपत विभाग, मुंबई)
नवीन पोलीस आयुक्त
*के. एल. प्रसाद (नवी मुंबई)
*राजेंद्र सिंग (औरंगाबाद)
*डॉ. सुरेश मेकला (अमरावती)
नवीन पोलीस अधीक्षक
*एम. एम. रानडे (सोलापूर)
*राजेश प्रधान (ठाणे ग्रामीण)
*मनोज शर्मा (कोल्हापूर)
*कैलाश कणसे (भंडारा)
*परमजितसिंग दाहिया (नांदेड)
*ज्योतीप्रिया सिंग (जालना)
*ए. एस. पारसकर (वर्धा)
*डॉ. संजय शिंदे (रत्नागिरी)
*एम. रामकुमार (नंदुरबार)
*एन. डी. रेड्डी (बीड)
*एस. व्ही. मोहिते (नाशिक ग्रामीण)