शीवमधील भाजी मंडईतून शनिवारी ७०० किलो कांद्याची चोरी उघडकीस आली आहे. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वैभव नाईक (५५) या विक्रेत्याचे प्रतीक्षानगर मंडईत दुकान आहे. शनिवारी त्यांना आपल्या दुकानातील १४ कांद्यांच्या गोण्यांची चोरी झालेली आढळली. या ७०० किलो कांदे होते. घाऊक बाजारात त्याची किंमत ३६ हजार रुपये आहे.

(संग्रहित छायाचित्र)