१५ टक्के सोसायटय़ांचे मुदतवाढीसाठी अर्ज

दररोज १०० किलोहून अधिक कचरा गोळा होणाऱ्या मोठय़ा सोसायटय़ांना कचरा व्यवस्थापन करण्याची सक्ती करण्यात आली असली, तरी अद्याप ७६ टक्के सोसायटय़ा त्यापासून दूरच राहिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत केवळ ९ टक्के म्हणजेच ३२६ सोसायटय़ांमध्येच कचरा व्यवस्थापन सुरू झाले असून केवळ ६२८ सोसायटय़ांनी मुदतवाढीसाठी लेखी परवानगी मागितली आहे.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
pimpri police commissioner office marathi news, pimpri police commissioner office latest news in marathi
पिंपरी : अखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय
Voting facility for Mumbai Thane Pune residents only in societies Pune news
मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास

शहराच्या कचराभूमीवरील भार कमी करण्यासाठी तसेच प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील मोठय़ा सोसायटय़ांना कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास २ ऑक्टोबरची मुदत दिली होती. २० हजार चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या, २००७ नंतर बांधकाम झालेल्या, १०० हून अधिक घरे असलेल्या त्याचप्रमाणे उपाहारगृह, हॉटेल यांनी कचरा व्यवस्थापन करणे अपेक्षित होते. शहरात अशा प्रकारच्या ४१४० सोसायटय़ा आहेत. त्यातील ३२६ सोसायटय़ांमध्ये २ ऑक्टोबपर्यंत कचरा व्यवस्थापन सुरू करण्यात आले. तर ६२८ सोसायटय़ांनी पालिकेकडे आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली. मात्र इतर ३१८६ सोसायटय़ांनी पालिकेला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पार्ले व अंधेरी पश्चिम येथे तब्बल ५६५ तर मालाड येथे ४५८ सोसायटय़ांमध्ये रोज १०० किलोहून अधिक कचरा गोळा होतो. दक्षिण मुंबईतील परळ, दादर, अंधेरी ते बोरिवली तसेच घाटकोपर, भांडुप परिसरात १०० किलोहून अधिक कचरा तयार होणाऱ्या सोसायटय़ांची संख्या अधिक आहे. उच्चभ्रू व सरकारी अधिकाऱ्यांची घरे असलेल्या मलबार हिल परिसरात अशा प्रकारच्या ३५ सोसायटय़ा असून त्यातील एकाही सोसायटीने कचरा व्यवस्थापन सुरू केलेले नाही. मात्र सर्व सोसायटय़ांनी मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत. परळमधील ३११ सोसायटय़ांपैकी १५ सोसायटय़ांनी मुदतवाढीसाठी अर्ज केले असून २५५ सोसायटय़ांनी पालिकेशी कोणत्याही प्रकारे संपर्क केलेला नाही.

केवळ २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया

शहरात दररोज साडेसात हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मोठय़ा सोसायटय़ांमधून कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आल्यावर त्यातून २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकते.

कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेचे अधिकारी सहकार्य करायला तयार आहेत. सोसायटय़ांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्साठी मुदतही मिळू शकते. मात्र  अनुत्सुक सोसायटय़ांबाबत कडक भूमिका घेणे आवश्यक आहे.

– अजोय मेहता, आयुक्त