नववी इयत्तेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. नापास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची गळती रोखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येते. त्याचप्रमाणे आता नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार आहे. नववीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. ती जूनमध्ये होईल. शालेय स्तरावरच ही परीक्षा घेण्यात येईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे.