नवजात बालकालाही आधार क्रमांक मिळणार

राज्यातील शासकीय अथवा खासगी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला यापुढे लगेच आधार क्रमांक दिला जाणार आहे. आधार प्रणालीत बालकाच्या जन्म तारखेची नोंद होणार आहे. राज्यात आधार संलग्न जन्म नोंदणी व्हावी, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
Why Buy Most BH Series Vehicle Number in Pune Who can get this number
विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?
megha engineering
निवडणूक रोखे खरेदीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मेघा इंजिनिअरिंग कंपनी CBI च्या रडारवर! गुन्हा दाखल
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

केंद्र सरकारतर्फे १२ अंकी वैयक्तिक क्रमांक हा आधार क्रमांक म्हणून दिला जातो. हा क्रमांक देशात कुठेही ओळखीचा पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा स्वंतत्र बाह्य़लक्षी तपशील व बायोमेट्रिक माहिती उपलब्ध करून दिली जाते. सद्यस्थितीत पाच वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीमध्ये बायोमेट्रिक माहिती, म्हणजे बोटाचे ठसे व डोळ्यातील बाहुलींची प्रतिमा यांची नोंद घेतली जात नाही. त्योऐवजी त्यांचे आधार क्रमांक त्यांच्या पालकांच्या आधार क्रमांकाशी जोडले जातात. त्यात नाव, जन्म दिनांक, लिंग, या माहितीची नोंद करणे बंधनकारक आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून राज्य सरकारने नवीन आधारशी संलग्न जन्म नोंदणी योजना कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे.

  • बालकाचे नाव हे ‘मूल’ म्हणून संबोधले जाईल. आईच्या नावाची नोंद करून ते कितवे मूल आहे, याची आधार क्रमांकात नोंद होईल
  • उदा : आईचे नाव गीता असेल आणि दुसऱ्या आपत्याची आधार नोंदणी करावयाची असल्यास, ‘गीता यांचे दुसरे मूल’ अशी नोंद होईल
  • अशा मुलांचे नाव नंतर अद्यावत करण्याची सोय.
  • राज्यात शासकीय अथवा खासगी रुग्णालयांत जन्म झालेल्या बाळाची आधार प्रणालीत नोंद गरजेची

अशी असेल नोंदणी

नवजात बालकाचे नाव निश्चित करण्यात आलेले नसल्यास त्याची नोंद विनानावे करणे आवश्यक