मालवणी विषारी दारूकांडानंतर मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर दारूच्या विरोधात कडक मोहीम सुरू केली आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा पद्धतीने दारूचा धंदा आढळला तर त्या संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई केली जाईल. संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तावरही कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केल्याची माहिती  सूत्रांनी दिली. गुन्हे शाखेने, समाजसेवा शाखेने अशा अशा धंद्यावर कारवाई केली तर त्या संबंधित विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला त्यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेळा असे प्रकार आढळल्यास पोलीस उपायुक्तांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल.