महिला आयुर्वेदिक डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल; औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार कारवाई

बेकायदेशीररीत्या गर्भपात किट वापरून रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या एका महिला आयुर्वेदिक डॉक्टरविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?

मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार असे किट आयुर्वेदिक डॉक्टर वापरू शकत नाही. बेकायदा गर्भपात जिवाला घातक ठरू शकतो, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

विक्रोळी येथील रुबी मेडिकल सेंटरमध्ये १८ ते २७ वर्षे वयोगटातील महिला रुग्णांचा बेकायदा गर्भपात केला जात आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना मिळाली होती. डॉ. सविता चव्हाण या आयुर्वेदातील एम. डी. असलेल्या डॉक्टरांकडून हे सेंटर चालविले जाते. तळमजल्यावर वेदांत हे औषधाचे दुकान तर पहिल्या मजल्यावर नर्सिग होमही चालविले जाते. छापा टाकला तेव्हा काही रुग्ण तेथे दाखल होते. नर्सिग होमप्रकरणी पालिकेने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

बेकायदेशीररीत्या मेडिकली टर्मिनेटेड प्रेगन्सी (एमटीपी) किट वापरले जात होते. या प्रकरणी गुप्तचर विभागाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार यांच्या नेतृत्वाखाली कोंडिबा गदेवार, धनंजय जाधव, शीतल देशमुख, अशोक राठोड या अन्न निरीक्षकांनी मध्यरात्री छापा टाकला असता न वापरलेले ११ किट तर वापरलेले १५ किट आढळून आले. या महिला डॉक्टरची पदवी खरी आहे का, याबाबत काहीही माहिती आढळून आली नाही.

या प्रकरणी औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील १८ क नुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कथित डॉ. चव्हाण यांना जबाब नोंदविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा संपर्क साधला. परंतु त्या प्रतिसाद देत नसल्याचे सहायक आयुक्त माधुरी पवार यांनी सांगितले.

एमटीपी किट कोण वापरू शकतो?

नोंदणीकृत एम. डी. (स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ) डॉक्टर्सच एमटीपी किट खरेदी करू शकतात. त्यांच्या देखरेखीखाली हा किट वापरण्याची मुभा आहे.