काँग्रेसचे माजी आमदार आणि ‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपी कन्हैयालाल गिडवाणी यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे शुक्रवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.  गिडवाणी यांना डॉक्टरांच्या देखभालीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गिडवाणी हे ‘आदर्श’ सोसायटीचे प्रवर्तक असून घोटाळ्याप्रकरणी त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाने अटकही केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.