ख्यातनाम वकिल व शिवसेना नेते अधिक शिरोडकर यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते.
शिवसेनेचे राज्यसभेतील माजी खासदार अधिक शिरोडकर हे वकिल म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वकिल म्हणूनही अनेकवेळा काम केले आहे. तसेच ते एक छायाचित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी शिवसेनेचे कायदेविषयक सल्लागार म्हणूनही काम केले होते.शनिवारी रात्री त्यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. शिरोडकर यांची अंत्यात्रा गिरगाव येथून दुपारी एक वाजता निघणार आहे.