आदित्य, तेजस ठाकरेंच्या राणीबाग भेटीने पाहुण्यांच्या विश्रांतीत अडसर

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई प्राणीसंग्रहालयात आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनना पाहण्यासाठी सर्वसामान्यांना नवीन वर्षांची वाट पाहावी लागणार असली तरी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे व त्यांचे बंधू तेजस यांच्यासाठी मात्र पेंग्विन दर्शनाची दारे लगेच उघडी करण्यात आली आहेत. राणीच्या बागेतील ‘काळ्या कोट’वाल्या पाहुण्यांचे युवराजांनी दर्शन घडवल्यानंतर आता आणखी काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकडून पेंग्विन दर्शनाच्या कामनापूर्तीची मागणी होऊ लागली आहे. अशा ‘व्हीआयपीं’च्या दूरध्वनींमुळे उद्यान व्यवस्थापक जेरीस आले असतानाच त्यांच्या दौऱ्यामुळे पेंग्विन पक्ष्यांच्या विश्रांतीतही विघ्न येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

वीरमाता जिजाबाई उद्यानात हम्बोल्ट पेंग्विनना येऊन उणेपुरे चार दिवस झाले असून त्यांचे आगमन चर्चेचा विषय ठरू लागले आहे. मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आणलेल्या या आठ पेंग्विनवरून एकीकडे शिवसेनेच्या विरोधात राजकीय वातावरण तापत असून प्राणी मित्र संघटना या पेंग्विनना आणल्याने विरोधाची भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे या पेंग्विनना का आणण्यात आले यावरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे समाजमाध्यमांवरून पालिकेची पाठराखण करत आहेत.

या घडामोडी सुरू असतानाच पेंग्विन मुंबईत आल्या-आल्या आदित्य व तेजस या ठाकरे सुपुत्रांनी त्यांची जिजाबाई प्राणीसंग्रहालयात जाऊन भेटही घेतल्याचे आता उघड झाले आहे. ठाकरे सुपुत्रांच्या भेटीनंतर मुंबईतील अन्य ‘अति महत्त्वाच्या’ व्यक्तींनाही या पेंग्विन भेटीची ओढ लागली असून ते फोनवरून उद्यान व्यवस्थापनाशी संपर्क साधत असल्याचेही सूत्रांकडून समजते.

यापैकी कोणत्या ‘व्हीआयपी’ची कामनापूर्ती झाली हे अद्याप उघड झालेले नाही. परंतु पेंग्विनना देखभाल आणि देखरेखीसाठी ज्या ‘क्वारंटाइन’ कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या कक्षाला लावलेली काचेची भिंत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्ये ‘मनसबदारांना’ दाखवण्यात येत असल्याचे समजते. पेंग्विन पक्ष्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ‘क्वारंटाइन’मध्ये आम्ही कोणीही आले तरी सोडू शकत नाही. तेथे फक्त पक्ष्यांची काळजी घेणारे कर्मचारी व डॉक्टर यांनाच प्रवेश देण्यात येतो. या क्वारंटाइनबाहेर एक काच व सीसीटीव्ही असून तेथूनच त्यांना पाहता येते, असे प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

कोटय़वधींचा खर्च

दक्षिण कोरियातील सेऊल येथून या पेंग्विनना मुंबईत आणण्यात आले असून या आठही पेंग्विनसाठी पालिकेला दोन कोटींचा खर्च झाला आहे. तसेच, सध्या त्यांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ‘क्वारंटाइन’मध्ये ठेवण्यात आले आहे. तीन महिन्यांनंतर त्यांना संग्रहालयातील नवीन इमारतीतील तळमजल्यावरील सतराशे चौरस मीटर जागेत ठेवण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी लांब काचेची भिंत असेल. हा संपूर्ण कक्ष उभारणीसाठीचा खर्च ८ कोटींचा असून पुढील पाच वर्षांत त्यांची देखरेख आणि त्यांना ठेवण्याची जागा व्यवस्थित राखण्यासाठी २० कोटींचा खर्च होणार आहे.

प्राणी मित्रांचा विरोध

जिजाबाई प्राणीसंग्रहालयातील इतर प्राण्यांची अवस्था बिकट असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कोटय़वधीचा खर्च करून या पेंग्विनना आणणे ही चुकीचीच बाब आहे. म्हणून आम्ही या पेंग्विनना आणण्याविरोधात प्राणी संग्रहालयाबाहेर आंदोलन केले, असे प्राणीमित्र आनंद सिवा यांनी सांगितले.