मराठी चित्रपटातील सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असला तरीही यापुढेही चांगले चित्रपट मिळतील की नाही, अशी भीती वाटते आहे, अशी हतबलता ‘स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्यातील विजेता अभिनेता मंगेश देसाई याने व्यक्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या १९ व्या ‘कलर्स स्क्रीन पुरस्कार’ सोहळ्यात मराठी चित्रपट विभागातील सवरेत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘खेळ मांडला’ चित्रपटातील दासू या व्यक्तिरेखेसाठी मंगेश देसाईने पटकाविला. यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो होतो. परंतु तेव्हा पुरस्कार हुकला. परंतु, ‘स्क्रीन’सारख्या मान्यवर सिनेसाप्ताहिकाचा सवरेत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. परंतु, तरीसुद्धा चांगले चित्रपट यापुढे मिळतील की नाही अशी भीतीही वाटतेय, अशा भावना मंगेश देसाईने व्यक्त केल्या. दिग्दर्शक विजू माने आणि निर्माता अशोक नारकर यांनी विश्वास दाखविल्यामुळेच पुरस्कार मिळाला, असेही मंगेश देसाईने स्पष्ट केले.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘सवरेत्कृष्ट अभिनेता’ पुरस्काराने हुलकावणी दिली तरी डिसेंबरमध्ये झालेल्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात ‘खेळ मांडला’मधील भूमिकेसाठी सवरेत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मंगेशला मिळाला होता. त्याचबरोबर ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्कारांमध्येही त्याला यश मिळाले होते. सिनेमा या माध्यमाबद्दल बोलताना मंगेश म्हणतो की हे नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचे माध्यम आहे असे मला वाटते. सतत नवे नवे शोधून नव्या नव्या पद्धतीने मांडण्याची संधी निर्माता-दिग्दर्शकापासून ते कलावंतांपर्यंत सर्वानाच असते.
आगामी चित्रपटांबद्दल विचारले असता तो म्हणाला की, फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान ‘२२ जून’ हा संजय मालवणकर दिग्दर्शित रहस्यमय थरारपटात नकारात्मक भूमिका साकारली असून ‘फेकमफाक’ या विनोदी रहस्यमय चित्रपटात अतिशय वेगळी अशी खलनायकी भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर ‘आंबट’ नावाचा सिनेमाही येऊ घातला असून त्यात रावडी सरपंचाची भूमिका अशा वैविध्यपूर्ण भूमिका नवीन वर्षांत तो साकारतोय. विजू माने यांच्याबरोबरही आपण ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ आणि ‘संतोष जुवेकर निदरेष आहे’ अशा दोन चित्रपटांमध्ये काम करणार आहे. सध्या या दोन्ही चित्रपटांचे पटकथा लेखन सुरू आहे अशी माहिती मंगेश देसाईने दिली. रंगभूमीवर येत्या वर्षांत कोणते नाटक करतोय, असे विचारले असता तो म्हणाला की, चांगली संहिता मिळाली तर नाटकात काम करण्याची मनापासून तीव्र इच्छा आहे.