अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘एआयबी नॉकआऊट’ या कार्यक्रमाप्रकरणी गिरगाव न्यायालयाने गुरुवारी कारवाईचे आदेश दिल्यानंतर काहीच वेळात ताडदेव पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि यात सहभागी झालेला निर्माता करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूर, रणवीर सिंग, अभिनेत्री अभिनेत्री दीपिका पदुकोण, आलिया भट यांच्यासह १४ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला.