राज्यात नशाबंदीचा कायदा करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. व्यसनाधितेमुळेच राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याची भावना अण्णा यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली. यासोबतच व्यसनाधिनता रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामसंरक्षण दल स्थापण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली आहे. ग्रामसंरक्षण दल स्थापन करण्यासंदर्भात विधिमंडळात कायदा आणण्याची मागणीही अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दारुबंदी करुनही दारुची विक्री रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत, त्यामुळे दारुबंदी असलेल्या गावात होणारी अवैध दारूविक्री रोखण्यासाठी लोकांनाच अधिकार द्यावेत, अशी मागणी देखील अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते.