‘सैराट’ या चित्रपटामध्ये आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू हिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आर्चीला पाहण्यासाठी झालेली तुफान गर्दी असो किंवा आर्चीचा शाळेतला पहिला दिवस अशा अनेक बातम्यांमुळे रिंकू सतत प्रसिद्धीच्या झोतात आहे. आता यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे ‘आर्ची’ साडीची. आपल्याकडे लोकप्रिय व्यक्तींची छबी असलेले कपडे परिधान करणे काही नवीन गोष्ट नाही. त्यामुळेच आता मुंबईमध्ये आर्ची साडीचा नवा ट्रेंड आला आहे. चित्रपटात सक्षम स्त्री भूमिका साकारणाऱ्या आर्चीचे छायाचित्र असलेल्या साड्या परिधान केलेला स्त्री-वर्ग शहरात काही ठिकाणी दृष्टीस पडतो आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकांच्यावेळी अशाच प्रकारे नरेंद्र मोदींची छबी असलेल्या साड्या बाजारपेठेत आल्या होत्या. या प्रकाराची चांगली चर्चादेखील रंगली होती. त्यानंतर आता नव्याने आलेला आर्ची साड्यांचा ट्रेंड कितपत लोकप्रिय होणार याकडे, अनेकांचे लक्ष लागले आहे.

(सौजन्य- ट्विटर)
(सौजन्य- ट्विटर)

Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा