देश आज झपाटय़ाने सकारात्मकरित्या बदलत असून त्याचा अर्थपूर्ण परिणाम दिसून येईल, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी व्यक्त केले. देशातील धोरणकत्रे, नोकरशहा, प्रसारमाध्यम, कॉर्पोरेटस आदी क्षेत्राशी संबंधित सर्व संस्थांनी सखोल ज्ञानाच्या माध्यमातून देशासमोरील सर्व मुद्यांना गांभिर्याने हाताळले तरच खऱ्या अर्थाने आपले कर्तव्य पार पाडले जाईल, असे जेटली यांनी नमूद केले.
मुंबईतील इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेच्या बाराव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी अर्थशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मर्यादित पर्याय उपलब्ध होते मात्र आज त्यांच्यासमोर सरकारी, कॉर्पोरेटस, व्यवस्थापन, खासगी व प्रसारमाध्यमे अशा अनेक क्षेत्रांत पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे जेटली म्हणाले. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हे सरकार सत्ताकारणापेक्षा प्रशासनाच्या सक्षमीकरणावर भर देत आहे, कारण याचा थेट संबंध अर्थव्यवस्थेशी आहे, असेही ते म्हणाले. इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था ही एक प्रतिष्ठित शैक्षणिक आणि संशोधन संस्था म्हणून नावारुपाला येत असल्याचे गौरवोद्गार काढत या संस्थेतून पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी या सर्व विद्यार्थ्यांना जेटली यांच्या हस्ते पदवी देण्यात आली. सध्याच्या काळात केवळ तुमची पदवी आणि क्षमता महत्त्वाची नसून ही पदवी तुम्ही कोणत्या संस्थेतून प्राप्त करत आहात, यालाही महत्त्वाचे स्थान असल्याचे ते म्हणाले.
या संस्थेतून पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७० टक्के महिला असल्याबद्दल कौतुक करताना जेटली म्हणाले की गेल्या काही काळात शिक्षण क्षेत्रातून दिसून येत असलेली महिलांची आघाडी स्वागतार्ह आहे. सामाजिक आणि आíथक हितासाठी सुरू करण्यात आलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ हे केवळ लोकप्रियतेपुरते आवाहन नसून जातीय अडथळे मोडून टाकण्यासाठी उचललेले पाऊल आहे असे त्यांनी नमूद केले. देशाच्या उत्क्रांतीमध्ये देशातील संस्थांनी परिणामकारक “िथक टँक” ची भूमिका पार पाडावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सध्याचे मुख्य आíथक सल्लागार अरिवद सुब्रमण्यम यांच्या आíथक विकास अभ्यासानुसार देशाच्या प्रगती आणि विकासासाठी पायाभूत सुविधा, आíथक व्यवस्था, कुशल जनता या घटकांबरोबरच “उत्तम संस्था” सुध्दा महत्त्वपूर्ण ठरली आहे, असे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले.