मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव रविवारी सकाळी सात वाजल्यापासून दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार केले जातील, असे शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर केले. शिवसेना कार्यकर्त्यांनी शांतता व संयम बाळगावी, भावनेच्या भरात कोणतेही अविवेकी कृत्य करू नये, शांतता राखावी व हिंसक कारवाया घडतील असे काहीही करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
ठाकरे यांच्या देशभरातील सर्व चाहत्यांनी व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी आता 'मातोश्री' निवासस्थानी गर्दी करू नये. अंत्यदर्शनासाठी देशभरातून येणाऱ्यांची सर्व व्यवस्था शिवाजी पार्क येथे केली जाईल. शिवसेनाप्रमुखांनी निष्ठा व संयम यासाठी आपले जीवन वाहिले. आता कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, हे पाहण्याची आपली जबाबदारी आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.




















आज मराठी माणूस अनाथ झाला.अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबाना श्रद्धांजली.