भाजप सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्याने सरकारकडे बहुमत आहे की नाही हे सिद्ध होऊ शकलेले नाही. यामुळेच हा विषय लावून धरून भाजपला अडचणीत आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. न्यायालयात आव्हान देण्याबरोबरच राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
भाजपची कोंडी करण्याकरिता काँग्रेसने ही खेळी केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागण्यात येणार आहे.  राष्ट्रपतींनी राज्यपालांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने केली जाणार आहे. न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय खुला असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.