तिकीट दरवाढ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कोणताही प्रयत्न न झाल्याने आज, रविवारपासून मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास महाग झाला आहे. बेस्ट वाहतुकीच्या दरवाढीचा पुढील टप्पा १ एप्रिलपासून लागू होईल. दरम्यान, बेस्टने मुंबई- ठाणे यादरम्यानच्या जुन्या वातानुकूलित सेवेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले असून पूर्व मुक्त मार्गावरून मंत्रालय ते ठाणेदरम्यानची सेवाही आजपासून सुरू होत आहे. यासोबतच बेस्टने नऊ मार्गावरील सेवाही बंद केल्या असून त्यात वडाळा- कळंबोली मार्गावरील वातानुकूलित सेवेचा समावेश आहे. तिकीट दरवाढीसह मासिक पास आणि विद्यार्थ्यांच्या पासमध्येही वाढ होत आहे.
भाडेवाढीचा तक्ता
mu07*पहिल्या टप्प्यातील
प्रवास भाडे : ७ रुपये
*चार किमीचे
बसभाडे : १० रुपये
*६० टक्क्यांहून अधिक प्रवाशांना भाडेवाढीची झळ

मुंबई-ठाणे एसी बस : पूर्व मुक्त मार्गावरून
ए ८ ही जलद सेवा

कुठून?
*लोढा पॅराडाइजवरून : सकाळी ८.१५
*हिरानंदानी इस्टेटवरून : सकाळी ८.३०
*प्रवास : बॅकबे आगारापर्यंत

परतीच्या वेळा
बॅकबे वरून :
सायं. ५.४५ (लोढा पॅराडाइजसाठी), सायं. ६.१५ (हिरानंदानी इस्टेटसाठी)

या सेवा बंद
*वडाळा-कळंबोली दरम्यानची एएस ५०३. ’३८, ९१,
४१४, ४८३, ५२० मर्या, ६१७, सी ५२ जलद हे मार्ग
*वडाळा आगार ते बोरिवलीदरम्यानची ४४० क्रमांकाची
सेवा रविवारी बंद