नारायण राणे काँग्रेसवासी तर कोकणात शिवसेना कमकुवत झाल्यावर निर्माण झालेली पोकळी राष्ट्रवादीने भरून काढली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत राष्ट्रवादीची ताकद वाढत गेली तशी गटबाजीही वाढली. आजी-माजी प्रदेशाध्यक्षांमधील गटबाजी आणि वादाने एवढे टोक गाठले की, शेवटी माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना मी नाराज आहे हे जाहीरपणे सांगण्याची वेळ आली. एवढे सारे होऊनही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने भास्कररावांना तेवढे महत्त्व दिलेले नाही. यापुढील काळात तटकरे हे भास्कररावांची अधिक कोंडी करतील, अशीच चिन्हे आहेत.

रायगडच्या सुनील तटकरे यांच्याकडे आघाडी सरकारच्या काळात अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्रिपद होते. कोकणात राणे आणि शिवसेना या दोन्ही आघाडय़ांवर आव्हाने स्वीकारत राष्ट्रवादीने हातपाय पसरले. रत्नागिरी जिल्ह्य़ात भास्कर जाधव हे प्रभावी नेते, पण त्यांचे तटकरे यांच्याशी फार कधी सख्य नव्हते. तटकरे यांनी सुरुवातीपासूनच भास्कररावांना दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. यातूनच उभय नेत्यांमध्ये कटुता निर्माण होत गेली. तटकरे विचारत नसल्याने जाधव यांनीही त्यांना फार काही किंमत दिली नाही.

Ashok Chavan, kanhan, Nana Patole,
नाना पटोले हे शरद पवार, उद्धव ठाकरेंसमोर बोलू शकत नाही, अशोक चव्हाण यांची टीका; म्हणाले, “स्वप्नांवर पाणी टाकले…”
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
war Of words between amol kolhe and shivajirao adhalrao patil over shirur lok sabha constituency
शिवाजीराव आढळरावांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशानंतर ‘शिरूर’मध्ये आता शब्दिक युद्ध
Sangli Lok Sabha
सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

पक्षांतर्गत संघर्ष

सध्या भास्कर जाधव हे नाराज आहेत. पक्ष सोडणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. आपण राष्ट्रवादी सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांनी आपल्या समर्थकांना अन्य कोणत्याही पर्यायांचा विचार करण्याचा मुक्त वाव दिला. यानुसार काही समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चिपळूण मतदारसंघातून भास्कररावांना उमेदवारी नाकारली होती. नाराज झालेल्या जाधवांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दोन वर्षांनी झालेल्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करीत भास्करराव निवडून आले. २००६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भास्कररावांना पहिला धक्का बसला. चिपळूण नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यात आली नाही. तरीही भास्कररावांनी राष्ट्रवादीमध्ये नवीनच असल्याने सहन केले. २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीतही हेच झाले. तेव्हा भास्कररावांचा पारा चढला आणि त्यांनी चिपळूणमध्ये वेगळी चूल मांडली. मुलाला व समर्थकांना अपक्ष उभे केले. २०१६ मध्ये पुन्हा तेच झाल्यावर त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि समर्थकांना उमेदवारी देण्यात असमर्थ ठरल्याने पक्षावरच तोंडसुख घेतले. चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम हे तटकरे यांच्या जवळचे तर भास्कररावांचे विरोधक. तटकरे यांनी जाधव यांच्या विरोधात रमेश कदम यांना शक्ती दिली. भास्कर जाधव हे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे निरीक्षक, पण चिपळूणची जबाबदारी रमेश कदम यांच्याकडे दिल्याने भास्करराव बिथरले होतेच.

२०११च्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळी भास्कर जाधव यांच्याकडे तळकोकणातील जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हा राष्ट्रवादीचा वाद नारायण राणे यांच्याशी झाला. राणे यांना त्यांच्याच पद्धतीने जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. शांतमय कोकणात आरेला कारे झाले आणि हिंसक घटना घडल्या. राणे यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्यावर थोडे दमाने घेण्याच्या सूचना पक्षाकडून जाधव यांना देण्यात आल्या होत्या.

पुढे काय?

नाराज भास्कर जाधव यांची समजूत काढण्याकरिता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत पाचारण केले होते. चिपळूण वगळता अन्यत्र लक्ष घाला, असा सल्ला पवारांनी दिल्याचे समजते. म्हणजेच स्वत:च्या गावात लक्ष घालू नका, असाच सल्ला भास्कररावांना पक्षाने दिला आहे. हा सल्ला भास्कररावांच्या वर्मी लागला आहे. तटकरे उट्टे काढण्याची संधी सोडणार नाहीत. राष्ट्रवादीतच राहणार असे जाहीर केलेल्या भास्कररावांची आणखी कोंडी केली जाईलच अशीच एकूण लक्षणे आहेत.

पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

भास्कर जाधव यांची काम करण्याची धडाडी किंवा संघटन वाढीकरिता कष्ट करण्याची धमक लक्षात घेता त्यांच्याकडे नगरविकास या महत्त्वाच्या खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते. तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आल्याने जाधव यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी कामगारमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.