प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. भारदस्त आवाज, खुमासदार व अभ्यासपूर्ण निवेदन ही त्यांच्या निवेदनाची वैशिष्ट्ये होती. मराठी साहित्यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. मराठीतील अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांची निवेदनाच्या शैलीतून प्रेरणा घेत अनेकांनी ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम कसा खुलवायचा हे त्यांना चांगले ठाऊक होते. अनेक गाण्यांचे कार्यक्रम, संगीत मैफली भाऊनी आपल्या निवेदन शैलीने खुलवल्या होत्या. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी आपल्या खास निवेदन शैलीने रंग भरले होते. ‘सरीवर सरी’ या कार्यक्रमाचे निवेदन करून त्यांनी आपल्या करकिर्दीची सुरूवात केली होती पण दुर्दैवी योगायोग म्हणजे ‘सरीवर सरी’ हा त्यांचा शेवटाचा कार्यक्रम  ठरला. १३ आँगस्ट रोजी दादर येथे ‘सरीवर सरी’ कार्यक्रमाचे निवदेन त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात एक विवाहित कन्या, जावई व नातू असा परिवार आहे.

Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Congress MLA Vishwajit Kadam Pushes for Vishal Patil to Contest Sangli Lok Sabha Seat Meets High Command
दिल्लीनंतर नागपूरकडे धाव; सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम…
Shahu Maharaj
शाहू महाराजांनी घेतली काडसिद्धेश्वर स्वामींची भेट; स्वामीनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा
Ravindra Dhangekar
“त्यांच्याकडे पहिलवान असले, तर आमच्याकडे..”, रवींद्र धंगेकर यांचा मोहोळ यांना टोला; शरद पवारांची घेतली भेट