शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी राज्य शासनातर्फे दिला जाणारा पंडीत भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सारंगीवादक पंडित राम नारायण यांना शनिवारी एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला. संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि ज्येष्ठ सतारवादक पंडित अरिवद पारेख यांच्या हस्ते पंडीत राम नारायण यांना गौरविण्यात आले. शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारया कलाकारास भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.