देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कागदावरील प्राध्यापकांची संख्या मोठी असून या ‘कागदी’अध्यापकांना आळा घालण्यासाठी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली असून जवळपास ९० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ९८५ बायोमेट्रिक डिव्हाइस बसविण्यातही आले आहेत. याचप्रमाणे सीसीटीव्हीही सक्तीचे करण्यात आले असून यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर थेट देखरेख ठेवता येणार आहे.

देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमसीआयच्या निकषांनुसार अध्यापक आहेत अथवा नाहीत, तसेच हे अध्यापक नियमितपणे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपस्थित राहतात अथवा नाही यावर बायोमेट्रिक पद्धतीमुळे एमसीआयचे थेट नियंत्रण राहणार आहे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

वैद्यकीय महाविद्यालयात बसविण्यात येणारी बायोमेट्रिक यंत्रणा ही थेट एमसीआयशी जोडण्यात येत असल्यामुळे रोजची अध्यापकांची उपस्थितीची माहिती एमसीआयला होणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा भवनासह महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्यामुळे यापुढे थेट गोंधळ अथवा घोटाळ्यांना आळा बसेल, असा विश्वास केईएमचे अधिष्ठाता व पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केला.

पालिकेच्या शीव व नायर वैद्यकीय महाविद्यालयांत बायोमेट्रिक उपकरणे बसविण्यात आली असून केईएममध्ये तीस उपकरणे बसविण्याचे काम सुरू आहे.

प्रामुख्याने खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कागदावर असलेली अध्यापकांची संख्या व प्रत्यक्षात शिकविण्यासाठी उपलब्ध असलेले अध्यापक हा कायमच वादाचा विषय राहिला असून बायोमेट्रिक हजेरीमुळे यापुढे कागदोपत्रीचे अध्यापक ही संकल्पना संपुष्टात येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. काही अध्यापक हे एकाच वेळी दोन खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकवत असल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही व बायोमेट्रिक हजेरीमुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील अध्यापकांची उपस्थिती स्पष्ट होणार आहे. देशभरात सुमारे सहा लाख डॉक्टरांची गरज असल्यामुळे जिल्हानिहाय वैद्यकीय महाविद्यालय काढण्याची योजना ‘एमसीआय’ने मांडली होती.

बायोमेट्रिक तसेच सीसीटीव्ही ही अत्यावश्यक गोष्ट असून वैद्यकीय अध्यापनातील अनिष्ट गोष्टींना यामुळे आळा बसेल.   डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय