मुंबईत सहा ठिकाणी दिवाळी पहाटचे आयोजन; २५ हजार रसिकांना सामावून घेण्याचा प्रयत्न

दहीहंडी, गणेशोत्सव, साई मंडळांनंतर आता ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने ‘भारतीय जनता पक्षा’ने (भाजप) पुन्हा एकदा शिवसेनेवर सांस्कृतिक कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत मुंबईभरात सहा ठिकाणी दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. सेनेने भाजपच्या या कार्यक्रमांची ‘पावसाळ्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर उगवणाऱ्या छत्र्या’ अशी भलामण केली आहे, तर दिवाळी पहाटचे पेटंट सेनेला दिलेले नाही, असा टोला लगावत भाजपने २५ हजार रसिकांना सामावून घेणारा आपला कार्यक्रम खऱ्या अर्थाने मुंबईकरांचा असल्याचा दावा केला आहे.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

मराठी सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या दिवाळी पहाटचे आयोजन शिवसेना गेली दहा वर्षे मुंबईभरात करत आली आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत दादर या शिवसेनेच्या हक्काच्या गडाला ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने सुरुंग लावला. तेव्हापासून मनसेवर मात करण्याकरिता दादरमध्येच शिवसेनेची ‘दिवाळी पहाट’ रंगत आली आहे. यंदाही २८ ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेतर्फे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आहे. फरक इतकाच की, ही ‘पहाट’ सायंकाळी रंगणार आहे; पण आता महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवत भाजपनेही मुंबईत सहा ठिकाणी दिवाळी पहाटचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. या पाश्र्वभूमीवर ‘शेठजी-भटजींचा पक्ष’ अशी ओळख असलेल्या भाजपने मराठी मनात शिरकाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दहीहंडी ते दिवाळी पहाट

दहीहंडी, गणेशोत्सव आदी मराठी सण आणि उत्सवांच्या सार्वजनिक आयोजनात पहिल्यापासून शिवसेनेने जाहीरपणे आयोजक मंडळांची तळी उचलून धरली आहे. त्याकरिता वेळोवेळी आपल्या ‘सामना’ या मुखपत्राचाही आधार सेनेने घेतला. मग न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रस्ते अडवून मंडप उभारणे असो वा ध्वनिक्षेपकाचे नियम मोडणे, अशा प्रत्येक बाबतीत मराठी मतांवर डोळा ठेवत सेनेने मंडळांना पंखाशी घेतले. दहीहंडीच्या आयोजनात न्यायालयाकडून आलेल्या र्निबधांच्या निमित्ताने या सांस्कृतिक राजकारणात शिरकाव करत भाजपनेही मंडळांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली. हा सिलसिला गणेशोत्सवातही चालला. यंदा तर भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार यांच्या नावाचे कटआऊट आणि जाहिरातीचे प्रवेशद्वार दादरच्या नवरात्रोत्सव मंडळांकडेही झळकले होते. त्यानंतर साई मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलावत भाजपने इथेही सेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. आता दिवाळी पहाटच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही संधी साधत सेनेवर कुरघोडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

‘दिवाळी पहाट’चे पेटंट आणि कुत्र्याच्या छत्र्या

‘‘भाजपतर्फे मुंबईभरात सहा ठिकाणी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिवाळी पहाट केवळ भाजप कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नाही. ही खऱ्या अर्थाने रसिक मुंबईकरांची आहे. म्हणूनच सर्व ठिकाणी मिळून साधारणपणे २० ते २५ हजार मुंबईकरांना सामावून घेतले जाणार आहे,’’ असे आशीष शेलार यांनी स्पष्ट केले. हा राजकीय कुरघोडीचा प्रयत्न नाही का, असे विचारता त्यांनी दिवाळी पहाटचे पेटंट सेनेला दिलेले नाही, असा टोला लगावला, तर ‘‘आम्ही राजकीय फायदे किंवा स्वार्थाकरिता नव्हे, तर परंपरा म्हणून दिवाळी पहाट साजरी करत आलो आहोत. इतरांचे कार्यक्रम हे पावसाळ्यात उगविणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे आहेत,’’ अशा शब्दांत दादरमधील आमदार आणि दिवाळी पहाटच्या आयोजनात पुढाकार घेणारे शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी भाजपच्या प्रयत्नांची भलामण केली.