रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केंद्रातील मंत्रीपदाची मागणी सोडावी व राज्यात मंत्री म्हणून यावे, यासाठी भाजपकडून पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस तसेच अन्य काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आठवले यांची बैठक झाल्याचे समजते. त्यात राज्यात कॅबिनेट मंत्री करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. परंतु आठवले यांचा केंद्रातील मंत्रिपदासाठीचा आग्रह कायम असल्याचे सांगण्यात येते. भाजपला आठवले यांची राज्यात अधिक उपयुक्तता वाटत आहे. विनायक मेटे व सदाभाऊ खोत यांची महामंडळांवर वर्णी लाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे समजते.