घाटकोपरमधील प्रकार; दलाल सक्रिय

घाटकोपरमधील मौलाना चाळ येथे काळा पैसा पांढरा करण्यात येत असल्याचा प्रकार प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. चाळीतील गरिबांना मोठय़ा रकमेचे प्रलोभन दाखवत त्यांच्या खात्यात काळा पैसा जमा करून तो पांढरा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरातील झोपडीधारकांकडून इतरांचा काळा पैसा बँकांमध्ये भरला जात असल्याची शक्यता असून, प्राप्तिकर विभागाने अशा संशयितांवर नजर ठेवली आहे.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी
Uran, Mango Trees Burn, Forest Fire, chirner, Farmers, Demand Compensation, Hundreds of Trees, marathi news,
उरण : जंगलातील आगीमुळे आंब्याच्या झाडांची राख

घाटकोपर येथील मौलाना चाळीत जवळपास ७०० भाडेकरू राहतात. या चाळीच्या भिंतीलगतच युनिटी अपार्टमेंट्स नावाची इमारत आहे. या इमारतीत एका सदनिकेत नव्यानेच आलेल्या रहिवाशांनी या गरीब चाळधारकांशी संधान साधत त्यांच्या खात्यांमध्ये १५ टक्के कमिशनच्या बदल्यात आपले काळे पैसे भरले आहेत. याबाबतची माहिती आयकर विभागाला कळल्यावर त्यांनी युनिटी अपार्टमेंटमधील सदनिकेवर छापा घातला. तेथे ३० लाखांहून अधिक रकमेच्या नव्या २ हजाराच्या नोटा आढळून आल्या. या सदनिकेत आठ तास तपासकार्य सुरू होते.

  • या प्रकारामागे दलालांचे मोठे रॅकेट असण्याचीही शक्यता आहे. काळे पैसेवाले आपले पैसे दलालांना आणून देतात. हे दलाल गरिबांना गाठून कमिशनचे प्रलोभन दाखवून त्यांच्या खात्यात पैसे टाकतात, असा संशय आहे.
  • मौलाना चाळीतील गरीब झोपडीधारक आपल्या खात्यातून २० हजार रुपये काढत होते. ते २३ हजारांच्या जुन्या नोटा आपल्या खात्यात भरत होते. नवे चलन १५ टक्के कमिशन कापून ते मुख्य दलालाकडे परत करत होते. मुख्य दलाल त्याच्याकडे काळे पैसे घेऊन आलेल्याकडून ३० टक्के कमिशन घेत होता, असे तपासात उघड झाले आहे.