मुंबई शहर आणि उपनगरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेला १ हजार २०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी ‘मनसे’ने केली आहे. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी एका ठरावच्या सूचनेने ही मागणी केली असून हा ठराव मंजुरीसाठी डिसेंबर महिन्यात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेला पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने या कारवाईत अडथळे येत आहेत. त्यामुळे पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळाला तर ही कारवाई चांगल्या प्रकारे करता येईल. शहर आणि उपनगरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी स्वतंत्र पोलीस ताफा कायम स्वरूपी तैनात केला जावा, अशी मागणीही देशपांडे यांनी या ठरावाद्वारे केली आहे.