जनतेमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. अवयव प्रत्यारोपण दिनाचे औचित्य साधून २७ मार्च रोजी पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये अवयवदान जनजागृतीबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच यावेळी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व मुख्यालयातील सर्व अधिकारी अवयवदानाचे संमतीपत्र भरून अवयवदानाबाबत समाजापुढे एक आदर्श ठेवणार आहेत. अवयवदान जनजागृतीसाठी पालिका रुग्णालयांमध्ये १०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.