बॉलीवूड अभिनेता सलमान खानला 'हिट अँड रन' प्रकरणात दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे समजल्यानंतर संपूर्ण बॉलीवूड सलमानच्या पाठीशी उभे राहिले आहे. जेव्हा तुमचा जवळचा व्यक्ती चुकीचा असला तरीही त्याला जेव्हा शिक्षा होते तेव्हा दु:ख होतेच. आमचे तुझ्यावर प्रेम आहे आणि सदैव तुझ्या पाठीशी आहोते, असे ट्विट अभिनेत्री आलिया भटने केले आहे. तर, अभिनेते ऋषि कपूर यांनी संपूर्ण कपूर परिवार खान कुटुंबियांच्यासोबत असल्याचे ट्विट केले असून या कठीण काळात सलमानला सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना ऋषि कपूर यांनी केली आहे. दरम्यान, सलमानला दोषी ठरविल्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर सलमानच्या आईची प्रकृती खालावल्याने त्यांना घरी नेण्यात आले. यानंतर बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, प्रिती झिंटा सलमानच्या आईला धीर देण्यासाठी सलमानच्या वांद्रे येथील घरी दाखल झाल्या आहेत.मी दुखी आहे सलमानसाठी. न्यायालयाच निर्णय स्विकार, आपल्या कायद्याप्रमाणे निर्णय़ घेतला. सलमानचे आजवरचे काम पाहता खूप चाहते दुखी, त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी- मनोज तिवारीन्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे पण, सलमानसाठी मला अतिशय वाईट वाटतयं- हेमामालिनीसलमान खानला मी व्यक्तिगत ओळखतो. तो चांगला व्यक्ती आहे. सलमानला झालेल्या शिक्षेमुळे मी दु:खी आहे. सलमानने मोठ्या प्रमाणावर समाज कार्य देखील केले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे- बाबूल सुप्रियोIt hurts when your own are punished, even if they are in the wrong. We love you and are standing by you— Alia Bhatt (@aliaa08) May 6, 2015The Kapoors are with the Khans in their difficult time. Time is the biggest healer. God Bless!— rishi kapoor (@chintskap) May 6, 2015Not commenting on courts verdict- but my heart goes out 2 @BeingSalmanKhan :large hearted & 1 of d finest people I hv met in this industry.— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2015