बॉलिवूडच्या तारे-तारकांना ग्लॅमरस लूकमध्ये टिपत त्यांना स्टारडम बहाल करणारे प्रसिध्द छायाचित्रकार जगदीश माळी यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी ११ वाजता साठीतील या कलंदर छायाचित्रकाराने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सायंकाळी उशीरा शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी अभिनेत्री अंतरा माळी असा परिवार आहे.
शबाना आझमी, ओम पुरी, अनुपम खेर, इरफान खान अशा वेगळ्या पठडीतील चेहऱ्यांना लोकांच्या समोर आणून त्यांच्यासाठी रुपेरी पडद्याची वाट सोपी करणाऱ्या माळी यांनी ८०च्या दशकापासून अनेक तारेतारकांची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपली. १९९८मध्ये त्यांना यकृताचा आजार झाला होता. मात्र त्यानंतर त्यांची तब्ब्येत ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले होते. याच यकृताच्या दुखण्याबरोबरच त्यांना नंतर आतडय़ाचा त्रासही सुरू झाला आणि त्याचमुळे त्यांचे निधन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..