पश्चिम रेल्वेवर लवकरच नव्या बम्बार्डिअर लोकल धावणार असल्या तरी या गाडय़ा सध्याच्या उपनगरी गाडय़ांच्या तुलनेत कमी वेगाने धावण्याची शक्यता आहे. सध्याच्या सीमेन्स कंपनीच्या उपनगरी गाडय़ा ताशी शंभर किलोमीटर वेगाने धावतात तर नव्या बम्बार्डिअर गाडय़ा ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने धावणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे प्रवासाला जास्त वेळ लागणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी उपरोक्त वेगाने बम्बार्डिअर लोकल चालविण्यास परवानगी दिली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने मोटरमन आणि गार्ड यांना सूचनाही दिल्या आहेत. बम्बार्डिअर लोकल केवळ ‘एसी विद्युत प्रवाहावर चालतात. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दोन बम्बार्डिअर लोकल पश्चिम रेल्वेवर चालविण्यास सुरुवात होणार आहे.