शासनाचे जिल्हा माहिती कार्यालय आणि मराठी ग्रंथ संग्रहालय-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान शहरातील कोर्टनाका येथील टाऊन हॉलमध्ये ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
 तीन दिवसांच्या या उत्सवाचे उद्घाटन सोमवारी संध्याकाळी चार वाजता सुप्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांच्या हस्ते होईल. जिल्हाधिकारी पी. वेळारासू कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, कवी अरुण म्हात्रे, कवयत्री डॉ. अनुपमा उजगरे आणि विभागीय माहिती संचालक डॉ. गणेश मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
आहेत.