24 October 2017

News Flash

गाडीखाली आलेल्या तरुणाचा तुटलेला हात १६ तासांनी मिळाला

उपनगरी रेल्वेखाली येऊन मृत्यू झालेल्या तरुणाचा तुटलेला हात तब्बल १६ तासांनी परत मिळविण्यात रेल्वे

प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 28, 2012 6:36 AM

उपनगरी रेल्वेखाली येऊन मृत्यू झालेल्या तरुणाचा तुटलेला हात तब्बल १६ तासांनी परत मिळविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले.
भायखळा येथे रेल्वे स्थानकाशेजारच्या पत्रा चाळीत राहणारा मोहम्मद रब्बानी अख्तर अंसारी हा १७ वर्षांचा तरूण रविवारी दुपारी रेल्वे मार्ग ओलांडत असताना गाडीखाली आला. त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याचा डावा हात गायब झाला होता. मोहम्मदचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सुपूर्द केला असला तरी त्याचा हरवलेला हात रेल्वे पोलीस शोधत होते.
सोमवारी सकाळी रेल्वे पोलिसांना भायखळा स्थानकाच्या फलाट क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या गटारामध्ये मोहम्मदचा तुटलेला हात सापडला. अपघात झाला तेव्हा त्याच्या हाताचा चेंदामेंदा होऊन तो बाजूच्या गटारात पडला होता.

First Published on November 28, 2012 6:36 am

Web Title: boys hand found after 16 hours who met with train accident