मुलुंड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या प्लास्टरचा काही भाग गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. प्लास्टरचा भाग पाचव्या आणि सहाव्या मार्गावर कोसळल्याने रेल्वे वाहतूक तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावरुन सोडण्यात आली. मात्र या घटनेमुळे रेल्वे सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. तसेच त्यात कुणीही जखमी झाले नाही.मुलुंड रेल्वे स्थानकामधील पादचारी पुलाच्या प्लास्टरचा काही भाग पाचव्या आणि सहाव्या मार्गावर कोसळला. त्यामुळे या मोर्गावरील रेल्वे वाहतूक तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावरुन सोडण्यात आली. परिणामी लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटलेल्या रेल्वे गाडय़ा २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. मात्र उपनगरीय सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.