कुलाबा येथे घराचे छत कोसळून १ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. गणेशमुर्तीनगर येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा अपघात घडला असून जखमींना उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुलाबा भागात नव्याने उभारत येत असलेली इमारत आज (शनिवार) दुपारी कोसळली. यावेळी येथे काम करत असलेल्या मजुरांपैकी एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून संसतधार पाऊस पडत असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.