माहीम येथील रेल्वे रुळावर नुकताच एका केबल व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला. महेंद्र राजपूत (४८) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या अंगावरील सात तोळे सोन्याचे दागिने चोरण्यात आले आहेत.
राजपूत हे माहीम येथे राहत होते. त्यांचा भागीदारीत केबलचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री ते शाहूनगर येथील एका जुगाराच्या अड्डय़ावर गेले होते. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यातील सात तोळे सोन्याचे दागिने आणि खिशातील १० हजारांची रोकड मारेकऱ्यांनी लंपास केली आहे.